मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Google : ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना लोक का फसतात?; गुगलनं चुकांबरोबरच सुरक्षेचे उपाय देखील सांगितले!

Google : ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना लोक का फसतात?; गुगलनं चुकांबरोबरच सुरक्षेचे उपाय देखील सांगितले!

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 15, 2024 12:29 PM IST

Google told user security mistakes : ऑनलाइन व्यवहार करतांना केलेल्या एका छोट्याशा चुकीमुळे तुमचा वैयक्तिक डेटा लीक होऊ शकतो. यामुळे बँक खातेही रिकामे होऊ शकते. या बाबत Google ने देखील अलर्ट दिला असून यूजर्सच्या काही चुका देखील सांगितल्या आहेत.

गुगल ने सांगीतल्या यूझर्सच्या चुका; दोन मिनिटांत होऊ शकते बँक खाते रिकामे! सुरक्षित राहण्यासाठी सांगितले ‘हे’ उपाय
गुगल ने सांगीतल्या यूझर्सच्या चुका; दोन मिनिटांत होऊ शकते बँक खाते रिकामे! सुरक्षित राहण्यासाठी सांगितले ‘हे’ उपाय

Google told user security mistakes : जगभरात सायबर गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सायबर चोरटे यूझर्सची वैयक्तिक माहिती चोरून त्यांच्या बँक खात्यावर देखील डल्ला मारत आहेत. ऑनलाइन फसवणुकीचा धोका लक्षणीय वाढला असून सायबर चोरटे आता नवनवीन पद्धतीने फसवणूक करत आहेत. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करतांना केलेली एक छोटीशी चूक तुमची वैयक्तिक माहिती लीक करू शकते. ज्यामुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. गुगलही या धोक्याबद्दल अलर्ट केले असून यूझर्सच्या सामान्यपणे करत असलेल्या चुका देखील सांगितल्या आहेत, ज्यामुळे ऑनलाइन स्कॅमचा धोका लक्षणीय वाढतो.

ट्रेंडिंग न्यूज

sanjay raut : श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये ५०० कोटींचा घोटाळा; गंभीर आरोप करत संजय राऊत यांचं फडणवीसांना आव्हान

एकच पासवर्ड वारंवार वापरणे

गुगलच्या साइन-इन सुरक्षेचे वरिष्ठ उत्पादन व्यवस्थापक श्रीराम करार म्हणाले की, वापरकर्त्यांना तोच पासवर्ड पुन्हा पुन्हा वापरण्याची सवय सोडावी लागणार आहे. जीमेल खात्याच्या सुरक्षिततेसाठी हे करणे आवश्यक आहे. तुमचा जीमेल पासवर्ड इतर प्लॅटफॉर्मवर शेअर केला असल्यास, वेळोवेळी पासवर्ड न बदलल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता. जीमेल पासवर्ड शेअरिंग प्लॅटफॉर्म हॅक झाल्यास तुमचे जीमेल खातेही सुरक्षित राहणार नाही, असे ते म्हणाले.

टू स्टेप व्हेरीफीकेशन

टू स्टेप व्हेरीफीकेश पडताळणी टाळणे म्हणजे तुमची ऑनलाइन फसवणुक होण्याची शक्यता आणखी वाढवते. साइन-इन सुरक्षा सुधारण्यासाठी टू स्टेप व्हेरीफीकेशन महत्त्वाचे आहे. वरिष्ठ उत्पादन व्यवस्थापक श्रीराम कारा यांनी सांगितले की, टू स्टेप व्हेरिफिकेशन स्टेपचा वापर करून अनेक प्रकारचे ऑनलाइन हल्ले टाळता येतात. हे वापरकर्त्यांना सर्व स्वयंचलित बॉट हल्ल्यांपासून देखील सुरक्षित ठेवते.

manoj jarange patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात उतरणार; 'या' तारखेपासून उपोषण करण्याचा इशारा

सॉफ्टवेअर अपडेट्सकडे दुर्लक्ष करणे

नवीनतम सॉफ्टवेअर अपडेट्स दुर्लक्ष करून वापरकर्ते स्वतःचे नुकसान करून घेऊ शकतात. Google च्या आयडेंटिटीचे समूह उत्पादन व्यवस्थापक ख्रिश्चन बँड म्हणाले की सॉफ्टवेअर अपडेट्स करण्याची शिफारस केली जाते. ऑनलाइन सुरक्षितता निश्चित करण्यासाठी डिव्हाइसमधील सॉफ्टवेअर अपडेट्स करणे खूप महत्वाचे आहे. या अपडेट्समध्ये सुरक्षा पॅच असतात, ज्यामुळे हॅकिंगचा धोका कमी होतो.

Israel Iran War : इस्रायल इराण तणावामुळे भारताचं टेन्शन वाढलं! युद्ध झाल्यास काय होऊ शकतो परिमाण? वाचा

मोबाइल स्क्रीन लॉक न करणे

साध्या पिनने फोनची स्क्रीन लॉक करणे धोकादायक ठरू शकते. हॅकर्स असा पिन सहज तोडून तुमचा डेटा चोरू शकतात. श्रीराम करा यांनी वापरकर्त्यांना १२३४ या सारखे सारखे सोपे पिन टाळण्याचा सल्ला दिला आहे.

संशयास्पद लिंकवर क्लिक करणे

सायबर गुन्हेगार संशयास्पद लिंक्स पाठवून वापरकर्त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतात. हॅकर्स हुबेहुब मूळ सारख्या दिसणाऱ्या लिंक्स पाठवून वापरकर्त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. गुगलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, वापरकर्त्याला कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यास किंवा न करण्यास पूर्णपणे मनाई करणे थोडे कठीण आहे. आजकाल, हॅकर्स बनावट लिंक्स वापरत आहेत, जे मूळ वेबसाईटसारख्या दिसतात. हे टाळण्यासाठी वापरकर्त्यांना स्वतःला थोडे सतर्क राहावे लागेल.

पासवर्ड रिकव्हरी प्लॅन नसणे

पासवर्ड विसरणे ही एक सामान्य गोष्ट आहे. सोशल मीडिया, नेट बँकिंग आणि ईमेल व्यतिरिक्त वापरकर्ते अनेक खात्यांसाठी वेगवेगळे पासवर्ड ठेवतात. इतके पासवर्ड लक्षात ठेवणे खूप कठीण होऊन बसते. फोन हरवला की समस्या खूप वाढते. अशा परिस्थितीत, तुमचा विसरलेला पासवर्ड रीकव्हर करण्याची तुमची योजना नसल्यास तुम्हाला खूप पश्चाताप होऊ शकतो. अशा परिस्थितीत, रीकव्हर ईमेल आणि फोन नंबर आपल्याला नेहमीच मदत करेल. यासह, Google तुमच्याशी संपर्क साधू शकेल आणि लॉक केलेल्या खात्यावर पुन्हा प्रवेश देण्यासाठी तुम्हाला सहकार्य करेल.

IPL_Entry_Point