मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  manoj jarange patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात उतरणार; 'या' तारखेपासून उपोषण करण्याचा इशारा

manoj jarange patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात उतरणार; 'या' तारखेपासून उपोषण करण्याचा इशारा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 15, 2024 10:26 AM IST

maratha reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकारला नवी डेडलाईन दिली आहे. जर आरक्षण मिळाले नाही तर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंची नवी डेडलाइन; 'या' तारखेपासून पुन्हा उपोषण करण्याचा दिला इशारा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंची नवी डेडलाइन; 'या' तारखेपासून पुन्हा उपोषण करण्याचा दिला इशारा

manoj jarange patil hunger strike : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मजोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकारला इशारा दिला आहे. जर जून महिन्याच्या आत जर मराठा आरक्षण मंजूर झाले नाही तर ५ जून पासून उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. येवढेच नाही तर नव्या आंदोलनाची घोषणा देखील केली आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी सुद्धा जोरदार करणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

ट्रेंडिंग न्यूज

Central Railway Special Trains : प्रवाशांसाठी खूशखबर! मध्य रेल्वे चालवणार ९२ अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी रविवारी मराठा आरक्षणाचा मुद्दा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा मांडला आहे. त्यांनी आरक्षणासाठी सरकारला नवी डेडलाइन दिली आहे. जर मागणी पूर्ण झाली नाही तर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. एवढेच नाही तर विधानसभा निवडणुकीची आम्ही जोरात तयारी करणार आहोत. जर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारणे मार्गी नाही लावला नाही तर ५ जून पासून मरण उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Sangli Superstition News : झाडाला आठवडाभर उलटं लटकवलं; अखेर तडफडून झाला मृत्यू, सांगलीत अघोरी प्रकाराने खळबळ

जरांगे पाटील म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या संविधानाने देशातील नागरिकांना खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे. माझा राजकीय मार्ग नाही; मी लोकचळवळीचा मार्ग अवलंबला आहे. मी कुठल्याच पक्षाचा नाही. आम्ही लोकसभेत उतरलो नसलो तरी आम्ही विधानसभेची तयारी जोरात करणार आहोत. मराठा समाज कोणाच्या सभांना देखील जात असून ते फक्त मजा बघत आहेत. ते उमेदवारांना पाडणार आहेत. हाच आमचा मोठा विजय राहणार आहे. डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी ६ धर्माची लोकं एकत्र आणता आली असती. मात्र, आम्हाला वेळ कमी असल्याने आम्ही लोकसभा निवडणुकीत उतरलो नाही. कारण लोकसभा निवडणूक मोठी असते. त्याचे कार्यक्षेत्र देखील मोठे असते. त्यामुळे आम्ही विधानसभेची तयारी करणार आहोत.

Pune Katraj news : आनंद मेळ्यात मनोरंजनासाठी जाणे मुलाच्या बेतले जिवावर! विजेच्या झटक्याने मृत्यू

मराठा आरक्षणासाठी जून महिन्याची डेडलाइन

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी ६ जूनची डेडलाइन दिली आहे. आरक्षणाचा प्रश्न जूनपर्यंत मार्गी लागला नाही तर पुन्हा आंदोलन करणार असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. ५ जूनपासून उपोषणाला सुरुवात करणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. आम्हाला महायुतीने काय दिले नाही, महाविकास आघाडीवाल्यांनी देखल काही खास दिले नाही. त्यांनी मिळणारे आरक्षण घालवले.

बहुमताशिवाय राजकारणाला किंमत नाही

जरांगे पाटील म्हणाले, बहुमताशिवाय राजकारणाला काही महत्व नाही. बहुमत नसेल तर कुणी किंमत देखील करत नाही. कारण केवळ भावनेच्या जीवावर मत मागता येत नाही आणि घेताही येत नाही, असे म्हणत निवडणूक लढणार नाही असे देखील जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. मला सगळ्या पक्षांनी व जाती-धर्मांनी पाठिंबा दिला होता. मी उभा राहिलो असतो तर खासदार झाला असतो. मात्र, राजकारण माझे क्षेत्र नाही असे पाटील म्हणाले.

IPL_Entry_Point