Central Railway Special Trains : प्रवाशांसाठी खूशखबर! मध्य रेल्वे चालवणार ९२ अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Central Railway Special Trains : प्रवाशांसाठी खूशखबर! मध्य रेल्वे चालवणार ९२ अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन

Central Railway Special Trains : प्रवाशांसाठी खूशखबर! मध्य रेल्वे चालवणार ९२ अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन

Apr 15, 2024 09:55 AM IST

Central Railway summer special trains : सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. यानिमित्त आपल्या गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. प्रवाशांची ही गर्दी लक्षात घेता त्यांची गैरसोय टाळावी या हेतूने मध्यरेल्वेने (Central Railway) ९२ अतिरिक्त रेल्वे चालवण्याचा (Special Trains) निर्णय घेतला आहे.

प्रवाशांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे ९२ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे धावणार
प्रवाशांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे ९२ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे धावणार (HT)

Central Railway Special Trains : सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. या सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी तसेच आपल्या मूळ गावी जाणाऱ्यांची शक्यता जास्त असते. अशा प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबईतुन तब्बल ९२ विशेष उन्हाळी गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांच्या आरक्षण बुकींसाठी सुरुवात झाली आहे. प्रवाशांना प्रत्यक्ष तिकीट घर येथे जाऊन किंवा ऑनलाइन पद्धतीने तिकीट बूक करता येणार आहे.

मुंबईत परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या विशेष उन्हाळी गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.

Sangli Superstition News : झाडाला आठवडाभर उलटं लटकवलं; अखेर तडफडून झाला मृत्यू, सांगलीत अघोरी प्रकाराने खळबळ

मध्य रेल्वेने सुरू केलेल्या उन्हाळी विशेष गाड्या

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-बनारस (०११३७) साप्ताहिक विशेष गाडीच्या १० फेऱ्या होणार असून ही साप्ताहिक विशेष गाडी २१ एप्रिल ते १९.मे पर्यंत दर रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी २.३० वाजता सुटणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी ९ बनारस येथे पोहोचेल.

तर ०११३८ साप्ताहिक विशेष गाडी ही २२ एप्रिल ते २० मे दरम्यान, दर सोमवारी रात्री ११ वाजता बनारस येथून सुटेल ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी पहाटे ०४.१० वाजता पोहोचेल. या गाडीला दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपुर, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी आणि वाराणसी येथे थांबे देण्यात आले आहेत.

गोरखपुर (०११६९) साप्ताहिक विशेष गाडीच्या २ फेऱ्या उन्हाळी फेऱ्या होणार असून ही गाडी १९ एप्रिल ते २४ मे दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री १२.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी ०८.२० वाजता गोरखपुर येथे पोहोचेल. तर ०११०२ ही साप्ताहिक विशेष गाडी २० एप्रिल ते २५ मे दरम्यान दर शनिवारी ११.२० वाजता गोरखपुर येथून सुटेल. ही गाडी मुंबईत दुसऱ्या दिवशी रात्री २३.४५ वाजता पोहोचेल.

Maharashtra Weather Update: राज्यात अवकाळी नंतर आता उष्णतेच्या लाटेचा इशारा! आज देखील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मऊ (०१०७९) या साप्ताहिक विशेष गाडीच्या अतिरिक्त ८ फेऱ्या होणार असून ही गाडी १७ एप्रिल ते २४ मे दरम्यान, तर ०८ मे आणि १५ मे दरम्यान, (अतिरिक्त ४ फेऱ्या) रोजी धावणार आहे. तर १०१०८० ही साप्ताहिक विशेष गाडी १९ एप्रिल ते २६ मे दरम्यान, तसेच १० ते १७ मे दरम्यान, अतिरिक्त ४ फेऱ्या या विशेष गाडीच्या होणार आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनस-समस्तीपुर अनारक्षित साप्ताहिक विशेष (१४ फेर्‍या)

०१०३९ अनारक्षित साप्ताहिक विशेष गाडी ही २२ एप्रिल ते ३ जून पर्यंत दर सोमवारी दुपारी ३.४५ दरम्यान, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सुटणार आहे. ही गाडी तिसऱ्या दिवशी ०३.३० वाजता समस्तीपुर येथे पोहोचेल. यागाडीच्या ७ अतिरिक्त फेऱ्या देखील होणार आहेत.

तर ०१०४० अनारक्षित साप्ताहिक विशेष गाडी ही २४ मे ते ४ जून पर्यंत दर बुधवारी समस्तीपुर येथून ०६.३० वाजता सुटेल ही गाडी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ४.४५ वाजता मुंबईत पोहोचेल.

दानापुर साप्ताहिक विशेष गाडी (०११५५) या विशेष गाडीच्या १४ फेऱ्या होणार असून ही गाडी १५ एप्रिल ते २७ मे दरम्यान दर सोमवारी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३० वाजता सुटेल व दानापुर येथे दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजता पोहोचेल. तर ०११५६ ही साप्ताहिक विशेष गाडी १६ एप्रिल ते २८ मे दरम्यान, दर मंगळवारी रात्री १० वाजता दानापुर येथून सुटेल व तिसऱ्या दिवशी पहाटे ०४.५० वाजता मुंबईत पोहोचेल.

salman khan firing case : सलमानच्या घरासमोर गोळीबार प्रकरणात मोठी माहिती! दोन हल्लेखोरांचे फोटो आले पुढे, ओळखही पटली

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-बनारस (०११४१) ही साप्ताहिक विशेष गाडी दर सोमवारी १५ एप्रिल पासून ते १३ मे पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी २.२० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजता बनारस येथे पोहोचेल. तर बनारस येथून सुटणारी ०११४२ साप्ताहिक विशेष गाडी ही १६ एप्रिल ते १४ मे दरम्यान. मंगळवारी रात्री ११ वाजता बनारस येथून सुटेल ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी पहाटे ०४.४५ वाजता पोहोचेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-गोरखपुर (०११४३) साप्ताहिक विशेष गाडी ही १८ एप्रिल ते १६ जून पर्यंत दर गुरुवारी दुपारी २.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी ११.३० वाजता गोरखपुर येथे पोहोचेल. तर गोरखपूर येथून सुटणारी ०११४४ ही साप्ताहिक विशेष गाडी २० एप्रिल ते १८ मे पर्यंत दर शनिवारी पहाटे ३.३० वाजता गोरखपुर येथून सुटेल व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १.३० वाजता पोहोचेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-आसनसोल साप्ताहिक विशेष गाडी ही १५ एप्रिल ते २७ मे पर्यंत दर सोमवारी ११.०५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल ही गाडी सनसोल येथे तिसऱ्या दिवशी पहाटे ०२.१५ वाजता पोहोचेल. तर ०११४६ साप्ताहिक विशेष गाडी ही १७ एप्रिल ते २९. मे पर्यंत दर बुधवारी रात्री १० वाजता आसनसोल येथून सुटेल व तिसऱ्या दिवशी सकाळी ०८.१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर