मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Katraj news : आनंद मेळ्यात मनोरंजनासाठी जाणे मुलाच्या बेतले जिवावर! विजेच्या झटक्याने मृत्यू

Pune Katraj news : आनंद मेळ्यात मनोरंजनासाठी जाणे मुलाच्या बेतले जिवावर! विजेच्या झटक्याने मृत्यू

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 15, 2024 08:51 AM IST

Pune Katraj news : कात्रज कोंढवा रस्तावर फाॅरेन सिटी एक्झिबेशनमध्ये लागलेल्या आनंद मेळाव्यात एका शाळेकरी मुलाचा विजेचा झटका लागल्याने मृत्यू झाला.

आनंद मेळ्यात मनोरंजनासाठी जाणे मुलाच्या बेतले जिवावर! विजेच्या झटक्याने मृत्यू
आनंद मेळ्यात मनोरंजनासाठी जाणे मुलाच्या बेतले जिवावर! विजेच्या झटक्याने मृत्यू

Pune Katraj news : पुण्यात कात्रज परिसरात फाॅरेन सिटी एक्झिबेशन येथे आनंद मेळावा लागला असून या मेळाव्यात वडिलांसोबत गेलेल्या ८ वर्षांच्या शाळकरी मुलासोबत रविवारी दुर्दैवी घटना घडली. या मुलाचा विजेच्या धक्का लागल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी प्रदर्शनाचे संयोजकांसह विद्युत पाळण्याच्या मालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Sangli Superstition News : झाडाला आठवडाभर उलटं लटकवलं; अखेर तडफडून झाला मृत्यू, सांगलीत अघोरी प्रकाराने खळबळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश राजू पवार (वय ८, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) असे विजेचा शॉक लागून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. फाॅरेन सिटी एक्झिबेशनचे संयोजक आणि विद्युत पाळण्याच्या मालकावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. गणेशचे वडील राजू पांडू पवार (वय ३७) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.

Maharashtra Weather Update: राज्यात अवकाळी नंतर आता उष्णतेच्या लाटेचा इशारा! आज देखील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

या घटनेचे वृत्त असे की, कात्रज-कोंढवा रस्त्यावरील एका मैदानात फाॅरेन सिटी एक्झिबेशनचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी लहान मुलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळणी व साहित्य लावण्यात आले आहे. या प्रदर्शनाला शनिवार आणि रविवारी अनेक नागरिक भेटी देत असतात. रविवारी गणेश व त्याचे वडील या ठिकाणी गेले. यावेळी गणेशने विद्युत पाळण्यात बसण्याची मागणी केली. त्याच्या वडिलांनी त्याचे तिकीट काढले आणि त्याला पाळण्यात बसण्यासाठी पाठवले.

Sweet Poha Recipe: सकाळी सकाळी गोड खावंसं वाटत आहे? नाष्टात बनवा गोड पोहे! जाणून घ्या रेसिपी

मात्र, जात असतांना तेथे असलेल्या जाळीत वीज प्रवाह उतराला होता. गणेशचा या जाळीला स्पर्श झाला. यावेळी गणेशला विजेचा जोरदार झटका लागला. यामुळे तो खाली कोसळला. या घटनेनंतर गोंधळाचे वातावरण तयार झाले. तातडीने विद्युत पाळण्याचा वीज प्रवाह खंडित करण्यात आला. बेशुद्ध झालेल्या गणेशला तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी संयोजक, तसेच विद्युत पाळण्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड तपास करत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग