मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: चालत्या ट्रेनमध्ये चढताना वृद्धाचा पाय घसरला; आरपीएफ अधिकाऱ्याने 'असा' वाचवला जीव

Viral Video: चालत्या ट्रेनमध्ये चढताना वृद्धाचा पाय घसरला; आरपीएफ अधिकाऱ्याने 'असा' वाचवला जीव

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 15, 2024 11:04 PM IST

RPF Officer Saves Senior Citizen Life: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या जवानाने एका वृद्ध व्यक्तीचा जीव वाचवला.

आरपीएफच्या एका अधिकाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे एका वृद्ध व्यक्तीचा जीव वाचला
आरपीएफच्या एका अधिकाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे एका वृद्ध व्यक्तीचा जीव वाचला

Prayagraj Railway Station Viral Video: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या एका अधिकाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे एका वृद्ध व्यक्तीचा जीव वाचला आहे. वृद्ध व्यक्ती अन्न खरेदी करण्यासाठी प्रयागराज जंक्शनवर उतरला. मात्र, ट्रेन सुरु झाल्याने वृद्ध व्यक्तीने पुन्हा रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांचा पाय घसरला. परंतु, घटनास्थळी उपस्थित असलेल्या रेल्वे अधिकाऱ्याने त्यांना पडण्यापासून वाचवले.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: विद्युत तारेच्या संपर्कात येऊन ९ वर्षाच्या मुलाचा मृत्यू; मुंबईच्या गोरेगाव येथील घटना

सज्जन कुमार (वय, ६३) असे वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. सज्जन कुमार हे गुवाहाटी- बिकानेर ट्रेन (क्र. १५६३४) सकाळी ११.१८ वाजता प्रयागराज स्थानकावर पोहोचली. ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर ट्रेनने सकाळी ११.३५ च्या सुमारास स्टेशन सोडले. हे सज्जन कुमार यांनी पाहिले. यानंतर संज्जन कुमार यांनी धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचा पाय घसरला. त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या आरपीएफच्या जवानांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून सज्जन कुमार यांचा जीव वाचवला.

Sangli Superstition News : झाडाला आठवडाभर उलटं लटकवलं; अखेर तडफडून झाला मृत्यू, सांगलीत अघोरी प्रकाराने खळबळ

संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून रेल्वेनेही या अधिकाऱ्याचे धाडसाचे कौतुक केले आहे. आपला जीव वाचवल्याबद्दल त्या व्यक्तीने रेल्वे पोलिसाचेही आभार मानले. जयपूरचा रहिवासी असलेल्या सज्जन कुमारला त्याच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी दुसऱ्या ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली.

मीरा भाईंदर: दुकानाचा स्लॅब कोसळल्याने दोन मजुरांचा मृत्यू

मीरा भाईंदरमध्ये रविवारी दुकानाचा स्लॅब कोसळल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. रविवारी १०.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. हरिराम चौहान (वय,५५) आणि माखनलाल यादव (वय, २६) अशी मृतांची नावे आहेत. तर, आकाश कुमार यादवला गंभीर दुखापत झाली असून जवळच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेत आकाशच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दुकानाचे मालक विनय कुमार त्रिपाठी याने दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या कामासाठी मजुरांना कामावर ठेवले होते. दरम्यान, नवघर पोलीस ठाण्यात मालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

IPL_Entry_Point

विभाग