कर्ज फेडायला करावं लागत बाबा…! स्वतःचा व्हिडीओ शेअर करत प्राजक्ता माळी असं का म्हणाली?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  कर्ज फेडायला करावं लागत बाबा…! स्वतःचा व्हिडीओ शेअर करत प्राजक्ता माळी असं का म्हणाली?

कर्ज फेडायला करावं लागत बाबा…! स्वतःचा व्हिडीओ शेअर करत प्राजक्ता माळी असं का म्हणाली?

Apr 16, 2024 02:46 PM IST

प्राजक्ता माळी हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक असा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती सतत न थांबता काम करताना दिसत आहे.

कर्ज फेडायला करावं लागत बाबा…! स्वतःचा व्हिडीओ शेअर करत प्राजक्ता माळी असं का म्हणाली?
कर्ज फेडायला करावं लागत बाबा…! स्वतःचा व्हिडीओ शेअर करत प्राजक्ता माळी असं का म्हणाली?

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणारी मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीचे अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. नाटक, मालिका, चित्रपट, वेब अशा वेगवेगळ्या माध्यमातून प्राजक्ता माळी हिने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेद्वारे प्राजक्ता माळी घराघरात पोहोचली या मालिकेतील प्राजक्ता माळी हिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली होती. अभिनयच नव्हे, तर सूत्रसंचालनाच्या क्षेत्रात देखील तिने आपलं नाव गाजवलं आहे. आता प्राजक्ता माळी हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक असा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती सतत न थांबता काम करताना दिसत आहे. या व्हिडीओला तिने हटके कॅप्शन दिलं आहे.

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राजक्ता नेहमी वेगवेगळे व्हिडीओ, फोटो आणि इतर काही गोष्टी शेअर करत असते. नुकताच तिने एक असा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याच्यामध्ये ती सतत काम करताना दिसत आहे. या कामादरम्यान तिनं जराही ब्रेक देखील घेतलेला नाही. या व्हिडीओला तिने कॅप्शन देताना त्याच्यात म्हटलं की, ‘कर्ज फेडायला करावं लागतं बाबा...’. अर्थात तिचे हे कॅप्शन गंमतीशीर असले तरी प्रेक्षक आणि चाहते यावर भन्नाट कमेंट करताना दिसत आहेत.

काय आहे या व्हिडीओमध्ये?

प्राजक्ता माळी हिने काही दिवसांपूर्वी कर्जतमध्ये एक मोठं फार्म हाऊस खरेदी केलं आहे. हे फार्म हाऊस खरेदी करताना तिने आपण कर्ज घेतल्याचं म्हटलं होतं अर्थात होम लोन घेऊन तिनं हे फार्म हाऊस विकत घेतलं आहे. आता या फार्म हाऊसचं कर्ज फेडण्यासाठी आपण कसं काम करतोय याची झलक तिनं तिच्या या व्हिडीओमधून दाखवली आहे. प्राजक्तांने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिच्या काही फोटोशूटचे कॅमेरामागील खास क्षण पाहायला मिळत आहेत. गेल्या आठवड्यावर प्राजक्ता माळी कामात प्रचंड व्यस्त होती. या दरम्यान तिने काही जाहिरातींसाठी फोटोशूट देखील केले. त्या फोटोशूट दरम्यानचा हा व्हिडीओ प्राजक्ता माळी अतिशय गंमतीशीर अंदाजात सोशल मीडियावर शेअर केला आहे.

कॅप्शनने वेधलं लक्ष!

या व्हिडिओच्या खाली दिलेल्या कॅप्शनमुळे तिने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. आता प्राजक्ता माळीच्या या व्हिडीओवर चाहत्यांच्या देखील वेगवेगळ्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. यावर एका चाहत्याने लिहिले की, ‘टेन्शन नॉट प्राजु... सगळं होईल.. कर्ज काय ते तर फिटेलच तुझी सगळी स्वप्नं पूर्ण होवोत, असेच देवाला मागेल मी’. आणखी एकाने कमेंट करत लिहिले की, ‘भावी वाटचालीस खूप शुभेच्छा!’

Whats_app_banner