Delhi rape crime : दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमधील मोदीनगरच्या कॉलनीत अत्यंत लाजिरवाणी घटना उघकडीस अली आहे. एक नराधम बाप आपल्याच अल्पवयीन मुलीवर सहा वर्षांपासून बलात्कार करत असल्याची लाजिरवाणी घटना उघडकीस आली आहे. वडिलांहे दुष्यकृत्य सर्व भाऊ आणि काकांना माहिती असतांना देखील त्यांनी त्यांना विरोध केला नाही. अखेर पीडित मुलीला हा त्रास सहन झाल्याने तिने थेट पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. तर अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
मोदीनगरच्या एका कॉलनीत राहणारी एक मुलगी मोदीनगर पोलिस स्टेशनमध्ये रविवारी पोहोचली. पोलीसांनी तिला काय झाले विचारले असता ती अचानक रडायला लागली. काही महिला पोलिसांनी तिला धीर देत पोलिस ठाण्याच्या प्रभारींसमोर नेले. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला रडण्याचे कारण विचारले असता तिने तिच्यावर घडलेला प्रसंग सांगितला. २०१८ मध्ये मुलीच्या आईचा मृत्यू झाला होता. आईच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी तिच्या वडिलांनी तिच्यावर बलात्कार करण्यास सुरुवात केली.
पीडिता ही पहिल्यांदा गरोदर राहिली तेव्हा तीच्या वडिलांनी तीचा गर्भपात केला. मुलीने सांगितले की ती पुन्हा एकदा गरोदर राहिली होती. यानंतर तिने हा प्रकार तिच्या भावाला, काका-काकांना सांगितला, पण सर्वांनी तिला गप्प केले आणि तिचा गर्भपात केला. त्यानंतरही वडिलांनी तिच्यावर बलात्कार करणे सुरूच ठेवले. तब्बल सहा वर्ष हा प्रकार सुरू होता. ती आता पुन्हा तीन महिन्यांची गरोदर असल्याचा आरोप मुलीने केला आहे. १६ एप्रिल रोजी वडिलांनी पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही तर १८ एप्रिल रोजी मारहाण करून तिला घराबाहेर हाकलून दिले.
एसीपी मोदीनगर ज्ञान प्रकाश राय यांनी सांगितले की, पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपी वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. अन्य आरोपी भाऊ, काका, काका यांचा पोलीस शोध घेत आहेत.
घराबाहेर जाऊ नये म्हणून वडिलांनी तिचे केस कापले, असाही आरोप मुलीने केला आहे. घरात वडीलांशिवाय फक्त लहान भाऊ राहतो. या घृणास्पद कृत्याची त्याला पूर्ण कल्पना होती, पण तो गप्प राहिला. पुराव्यासाठी मुलीने बलात्काराचा व्हिडीओ बनवून नातेवाइकांना दाखवला, मात्र सर्वजण गप्प राहिले. त्यामुळे पोलिसांनी एफआयआरमध्ये मुलीचा भाऊ, काका आणि मामालाही आरोपी केले आहे.
आणखी एका प्रकरणात गाझियाबादच्या वेव्ह सिटी पोलीस स्टेशन परिसरात एका तरुणाने १५ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी तरुणाने जवळच्या परिसरातून कुराण शरीफचे पठण करून घरी परतणाऱ्या मुलीला एका खोलीत नेले आणि तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.