मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News: लग्नपत्रिकेत 'या' गोष्टींचा उल्लेख करणं पडेल महागात; पाहताच पोलीस दाखल करतील गुन्हा

Viral News: लग्नपत्रिकेत 'या' गोष्टींचा उल्लेख करणं पडेल महागात; पाहताच पोलीस दाखल करतील गुन्हा

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 25, 2024 05:36 PM IST

Hyderabad Wedding Card News: सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या लग्नपत्रिकेची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

हैदराबाद येथील एका तरुणाने छापलेली लग्नपत्रिका चर्चेचा विषय बनला आहे.

Hyderabad Wedding Card Goes Viral: सोशल मीडियावर व्हायरल झालेली लग्नपत्रिका पाहून पोलिसांनी नवरदेवाविरुद्ध गुन्ह दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. या लग्नपत्रिकेत नेमके असे काय छापण्यात आले? हे पाहिल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली, हे जाणून घेण्यासाठी अनेकांना उस्तुकता लागली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Video: अमिताभ बच्चन यांनी गेल्या वर्षी का नाकारला ‘लता मंगेशकर’ पुरस्कार? स्वतः सांगितलं कारण!

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली लग्नपत्रिका तेलंगणा राज्यातील असल्याचे बोलले जात आहे. या लग्नपत्रिकेत दिलेल्या माहितीनुसार, सुरेश नाईक असे नवरदेवाचे नाव आहे. तो मेडक जिल्ह्यातील मोहम्मद नगर गेट ठांडा येथील रहिवाशी आहे. सुरेशने आपल्या लग्नपत्रिकेत लोकसभा निवडणुकीला उभ्या असलेले उमेदवार घुनंदन राव यांचा फोटो छापला. तसेच लग्नाची भेट म्हणून आगामी निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन त्याने पाहुण्यांना केले. ही लग्नपत्रिका स्थानिक पोलिसांपर्यंत पोहचली. त्यानंतर संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Video : आंतरराष्ट्रीय खेळाडूंचं असं स्वागत बघितलंय का? वेस्ट इंडिज संघासोबत नेपाळमध्ये घडला विचित्र प्रकार

दिल्ली: महिलेचा बिकनी घालून बसमधून प्रवास

दिल्लीत एका महिलेचा बिकिनी घालून बसमधून प्रवास करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला काहींनी 'अश्लीलता' असे म्हटले आहे. तर, काहींनी तिला हवे ते परिधान करणे ही तिची निवड असल्याचे मत व्यक्त केले. काही दिवसापूर्वी ही पोस्ट शेअर करण्यात आली. तेव्हापासून या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास १० लाख व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर लोकांच्या अनेक कमेंट्स आल्या आहेत. काहींनी बसमध्ये बिकिनी घातलेल्या महिलेवर टीका केली, तर काहींनी तिचे समर्थन केले.

तामिळनाडू: स्मोक्ड बिस्किट खाल्ल्याने मुलाचा मृत्यू

चेन्नईच्या तामिळनाडू येथे स्मोक्ड बिस्किट खाल्ल्याने एका चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात मुलगा नायट्रोजन स्मोक बिस्किट खाताना दिसतो. मात्र, काही क्षणातच त्याची तब्येत बिघडते. मुलाला नेमका कशाचा त्रास होत आहे, हे पालकांना समजण्याच्या आधीच त्याचा मृत्यू होतो. नायट्रोजन स्मोक्ड बिस्किटांच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. स्मोक्ड बिस्किट पाहून लहान मुले त्याकडे आकर्षित होतात आणि ते खायला आतुर होतात. स्मोक्ड बिस्किट शरिरासाठी हानीकारक असून तामिळनाडू सरकारने यावर बंदी घालावी, अशी मागणी केली जात आहे. यापूर्वी ऑनलाईन ऑर्डर केलेल्या केक खाऊन ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.

IPL_Entry_Point

विभाग