मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Video : आंतरराष्ट्रीय खेळाडूंचं असं स्वागत बघितलंय का? वेस्ट इंडिज संघासोबत नेपाळमध्ये घडला विचित्र प्रकार

Video : आंतरराष्ट्रीय खेळाडूंचं असं स्वागत बघितलंय का? वेस्ट इंडिज संघासोबत नेपाळमध्ये घडला विचित्र प्रकार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 25, 2024 03:32 PM IST

Nepal vs West Indies A T20 Series : नेपाळमध्ये वेस्ट इंडिज अ संघाचे अतिशय विचित्र पद्धतीने स्वागत करण्यात आले आहे. हा व्हिडीओ तुम्हाला आश्चर्याचा धक्का देणार आहे.

Video : आंतरराष्ट्रीय खेळाडूंच असं स्वागत बघितलय का? वेस्ट इंडिज संघासोबत नेपाळमध्ये घडला विचित्र प्रकार
Video : आंतरराष्ट्रीय खेळाडूंच असं स्वागत बघितलय का? वेस्ट इंडिज संघासोबत नेपाळमध्ये घडला विचित्र प्रकार

Nepal vs West Indies A : क्रिकेटमध्ये सध्या आयपीएल २०२४ थरार सुरू आहे. त्यामुळे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष फक्त आयपीएलवर आहे. पण क्रिकेट जगतात आंतरराष्ट्रीय मालिकादेखील खेळल्या जात आहेत. पण आयपीएलच्या लोकप्रियतेमुळे त्या मालिकांकडे कोणाचेही फारसे लक्ष नाही.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वेस्ट इंडिजचा अ संघ नेपाळ दौऱ्यावर पोहोचल्याचे दिसत आहे. नेपाळ आणि वेस्ट इंडिज अ यांच्यात टी-20 मालिका खेळली जाणार आहे.

नेपाळमध्ये वेस्ट इंडिज अ संघाचे अतिशय विचित्र पद्धतीने स्वागत करण्यात आले आहे. हा व्हिडीओ तुम्हाला आश्चर्याचा धक्का देणार आहे.

वास्तविक, वेस्ट इंडिज अ संघाचे खेळाडू स्वतः त्यांचे सामान एका लोडरमध्ये लोड करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, वेस्ट इंडिजचे खेळाडू विमानतळावरून बाहेर पडतात आणि नंतर त्यांचे सामान एका लोडरवर चढवतात.

लोडरवर सामान चढवल्यानंतर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना एका बसमधून हॉटेलमध्ये नेण्यात येते. पण संघासाठी उपलब्ध असलेली बस अतिशय साधी आहे. कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघासाठी अशी बस तुम्ही क्वचितच पाहिली असेल.

नेपाळ-वेस्ट इंडिज टी-20 मालिका रंगणार

नेपाळ आणि वेस्ट इंडिज अ यांच्यात ५ टी-20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेला शनिवारी (२७ एप्रिल) सुरुवात होणार आहे, तर शेवटचा सामना ४ मे रोजी होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने कीर्तिपूर येथील त्रिभुवन विद्यापीठाच्या क्रिकेट मैदानावर खेळवले जातील.

मालिकेतील पहिला सामना २७ एप्रिल रोजी होणार आहे. यानंतर दुसरा सामना रविवार, २८ एप्रिल रोजी होणार आहे. त्यानंतर तिसरा सामना १ मे, बुधवार, चौथा सामना २ मे, गुरुवारी आणि पाचवा सामना ४ मे शनिवारी खेळवला जाईल.

जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी नेपाळसाठी ही मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे. या मालिकेद्वारे नेपाळला स्पर्धेची तयारी करता येईल.

IPL_Entry_Point