RCB vs GT Head to Head : आज विराट-शुभमन भिडणार, कोणता संघ मजबूत? बंगळुरूची पीच कशी असेल? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RCB vs GT Head to Head : आज विराट-शुभमन भिडणार, कोणता संघ मजबूत? बंगळुरूची पीच कशी असेल? जाणून घ्या

RCB vs GT Head to Head : आज विराट-शुभमन भिडणार, कोणता संघ मजबूत? बंगळुरूची पीच कशी असेल? जाणून घ्या

May 04, 2024 11:05 AM IST

RCB vs GT Head-to-Head Record : फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघ पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. तर शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स संघ आठव्या स्थानावर आहे.

RCB vs GT Head to Head : आज विराट-शुभमन भिडणार, कोणता संघ मजबूत? बंगळुरूची पीच कशी असेल? जाणून घ्या
RCB vs GT Head to Head : आज विराट-शुभमन भिडणार, कोणता संघ मजबूत? बंगळुरूची पीच कशी असेल? जाणून घ्या (PTI)

RCB vs GT Pitch Report : आयपीएल २०२४ च्या ५२ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनसामने येणार आहेत. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दोन्ही संघांना सामना जिंकणे आवश्यक आहे, त्यामुळे हा सामना रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.

फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघ पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. तर शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स संघ आठव्या स्थानावर आहे. 

आरसीबीने त्यांचे मागील दोन्ही सामने जिंकले आहेत. तर गुजरात टायटन्सला त्यांच्या याआधीच्या सामन्यात आरसीबीकडून ९ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. मागील पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने गुजरात मैदानात उतरणार आहे. तर आरसीबी आपली विजयी मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.

आरसीबी वि. गुजरात पीच रिपोर्ट

बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावरील पीच पूर्णपणे सपाट आहे. येथे फलंदाज खूप धावा करताना दिसतात. गोलंदाजांसाठी फारशी मदत दिसत नाही, पण स्लो चेंडू प्रभावी ठरू शकतात. येथील सामना हाय स्कोअरिंग होईल अशी अपेक्षा आहे. दव लक्षात घेता नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एकूण ९० आयपीएल सामने खेळले गेले आहेत. यजमान आणि पाहुण्या दोन्ही संघांनी ४२-४२ सामने जिंकले आहेत. ४ सामन्यांचा निकाल लागला नाही. २ सामने रद्द झाले.

आरसीबी वि. गुजरात हेड-टू-हेड रेकॉर्ड

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात आतापर्यंत एकूण ४ सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी दोन्ही संघ २-२ अशा बरोबरीत आहेत. उभय संघांमधील शेवटच्या सामन्यात आरसीबीने ९ गडी राखून मोठा एकतर्फी विजय नोंदवला होता. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये एक सामना खेळला गेला, ज्यामध्ये आरसीबीला गुजरातकडून ६ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.

दोन्ही संघ 

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ : फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, यश दयाल, अनुज रावत, महिपाल लोमर, हिमांशू. शर्मा, आकाश दीप, विजयकुमार विशक, रीस टोपले, टॉम कुरन, लॉकी फर्ग्युसन, मयंक डागर, अल्झारी जोसेफ, सुयश प्रभुदेसाई, मनोज भंडागे, सौरव चौहान, राजन कुमार  

गुजरात टायटन्स स्क्वॉड :  वृद्धीमान साह, शुभमन गिल (कर्णधार) , डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा, संदीप वॉरियर, शरथ बीआर, विजय शंकर, मानव सुथार, दर्शन नळकांडे, मॅथ्यू वेड, उमेश यादव, केन विल्यमसन, जयंत यादव, अभिनव मनोहर, जोशुआ लिटल, कार्तिक त्यागी, स्पेन्सर जॉन्सन, सुशांत मिश्रा.

Whats_app_banner