टी-20 विश्वचषक २०२४ हा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या भूमीवर खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा २ जूनपासून सुरू होत आहे. त्याचबरोबर टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना २९ जून रोजी होणार आहे.
टी-20 वर्ल्डकपसाठी भारताने १५ सदस्यीय संघही जाहीर केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात आयर्लंडविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यात ५ जून रोजी सामना होणार आहे.
यानंतर टीम इंडिया ९ जून रोजी दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
दरम्यान, या टी-20 वर्ल्डकपची बक्षीस रक्कम समोर आली आहे. T20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला किती पैसे मिळतील? हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
T20 विश्वचषकाची एकूण बक्षीस रक्कम ५.६ मिलियन डॉलर्स आहे. जर आपण भारतीय रुपयांमध्ये किंमत पाहिली तर ती अंदाजे ४६.७७ कोटी रुपये होते. त्याचबरोबर विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला १.६ मिलियन डॉलर्स मिळतील. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत १३.३६ कोटी रुपये होईल. तर उपविजेत्याला ६.६८ कोटी रुपये मिळतील. म्हणजेच टी-२० विश्वचषक फायनलमध्ये पराभूत होणाऱ्या संघावरही पैशांचा वर्षाव होणार आहे.
T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना ३.३२ कोटी रुपये मिळतील. तर सुपर-१२ टप्प्यातून बाहेर पडलेल्या संघांमध्ये ५.८५ कोटी रुपये वितरित केले जातील. म्हणजेच ही रक्कम सर्व संघांमध्ये विभागली जाईल.
२ जूनपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या मैदांनावर स्पर्धेचे सामने खेळवले जातील. अलीकडेच या स्पर्धेसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. भारतीय संघ पहिल्या दोन सामन्यांमध्ये अनुक्रमे आयर्लंड आणि पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरेल.
T20 विश्वचषक २०२४ साठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, ए. पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
राखीव : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान.