आयपीएल २०२४ च्या ५२ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनसामने येणार आहेत. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दोन्ही संघांना सामना जिंकणे आवश्यक आहे, त्यामुळे हा सामना रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.
फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघ पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. तर शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स संघ आठव्या स्थानावर आहे.
दरम्यान, आरसीबी असो की गुजरात, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
विकेटकीपरसाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. पहिला वृद्धिमान साहा आणि दुसरा दिनेश कार्तिक. साहा डावाची सुरुवात करेल म्हणजेच पॉवरप्लेमध्ये खेळेल, पण गुजरातच्या सलामीवीराचा फॉर्म चांगला नाही. अशा परिस्थितीत दिनेश कार्तिक हा एक चांगला पर्याय असेल.
फलंदाजीत विराट कोहली, फाफ डू प्लेसिस, रजत पाटीदार, डेव्हिड मिलर आणि शुभमन गिल, साई सुदर्शन हे सर्वोत्तम पर्याय असतील. कोहलीचा अलीकडचा फॉर्म अप्रतिम आहे. गुजरातविरुद्ध खेळल्या गेलेल्या याआधीच्या सामन्यात विराटने नाबाद ७० धावा केल्या होत्या. त्याचवेळी शुभमन गिल चिन्नास्वामीच्या छोट्या मैदानावरही खळबळ माजवू शकतो. साई सुदर्शनने या स्पर्धेत गुजरातकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत.
अष्टपैलू म्हणून विल जॅक हा सर्वात मजबूत पर्याय असेल. गुजरातविरुद्ध खेळल्या गेलेल्या याआधीच्या सामन्यात जॅकने स्फोटक शतक झळकावले होते. जॅकने केवळ दोन षटकांत ५७ धावा केल्या होत्या. बॅटसोबतच जॅक्स तुम्हाला बॉलने गुण मिळवून देऊ शकतो. जर तुम्ही पॉइंट मॅनेज करू शकत असाल तर तुम्ही कॅमेरॉन ग्रीनला देखील ड्रीम इलेव्हनमध्ये ठेवू शकता.
मोहम्मद सिराज, यश दयाल आणि रशीद खान हे त्रिकूट तुम्हाला या सामन्यात चांगले गुण मिळवून देऊ शकतात. सिराज फॉर्ममध्ये परतला असून गेल्या सामन्यात तो चेंडूने आग ओकताना दिसला आहे. त्याच वेळी, रशीद खान त्याच्या फिरकीच्या जाळ्यात सर्वात मोठ्या फलंदाजाला अडकवू शकतो.
यष्टिरक्षक – दिनेश कार्तिक
फलंदाज - फाफ डू प्लेसिस, विराट कोहली (कर्णधार), रजत पाटीदार, डेव्हिड मिलर, शुभमन गिल (उपकर्णधार), साई सुदर्शन
अष्टपैलू - विल जॅक्स
गोलंदाज- मोहम्मद सिराज, यश दयाल, राशिद खान
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू : फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, यश दयाल, अनुज रावत, महिपाल लोमर, हिमांशू. शर्मा, आकाश दीप, विजयकुमार विशक, रीस टोपले, टॉम कुरन, लॉकी फर्ग्युसन, मयंक डागर, अल्झारी जोसेफ, सुयश प्रभुदेसाई, मनोज भंडागे, सौरव चौहान, राजन कुमार.
गुजरात टायटन्स स्क्वॉड : वृद्धीमान साह, शुभमन गिल (कर्णधार) , डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा, संदीप वॉरियर, शरथ बीआर, विजय शंकर, मानव सुथार, दर्शन नळकांडे, मॅथ्यू वेड, उमेश यादव, केन विल्यमसन, जयंत यादव, अभिनव मनोहर, जोशुआ लिटल, कार्तिक त्यागी, स्पेन्सर जॉन्सन, सुशांत मिश्रा.