Amitabh Bachchan Received Lata Deenanath Mangeshkar Award: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना नुकतेच ‘लता दीनानाथ मंगेशकर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा मुंबईतील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडला. ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार स्वीकारल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले की, ‘गेल्या वर्षी देखील मला या पुरस्कारासाठी बोलवण्यात आले होते. मात्र, मी गेल्या वर्षी हा पुरस्कार नाकारला होता. तब्येतीचे कारण देत मी त्यावेळी येऊ शकणार नाही असे कळवले होते. मात्र, असे काहीही नव्हते. मी त्यावेळी एकदम ठीक होतो. परंतु, मी स्वतःला या पुरस्कारायोग्य समजत नव्हतो’.