Uttar Pradesh Viral News: उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये इयत्ता दहावीत मिळालेले गुण पाहून एका विद्यार्थ्याला आश्चर्याचा धक्का बसला आहे. परीक्षेत मिळालेले गुण पाहून संबंधित विद्यार्थी चक्क जमीनीवर कोसळला. यानंतर पालकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.
अंशुल कुमार असे रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. अंशुल हा मेरठच्या मोदीपुरम येथील महर्षी दयानंद इंटर कॉलेजमधील विद्यार्थी आहे. नुकत्याच पार पडलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत त्याला ९३.५ टक्के गुण मिळवले. हे पाहून भरावून गेला आणि काही क्षणातच जमीनीवर कोसळला. यानंतर त्याच्या घरच्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले, जिथे आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
अंशुलचे वडील सुनील कुमार हे पोस्ट ऑफिसमध्ये कंत्राटी कामगार असून त्यांनी इंडिया टुडेला ही घटना सांगितली. अंशुलचा चुलत भाऊ पुष्पेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीयूमध्ये दाखल झाल्यानंतर अंशुलच्या प्रकृतीत सुधारणा झाली, तो अजूनही रुग्णालयात दाखल असून त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.
उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षा परिषदेने नुकताच यूपी बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला. दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल ८९.५५ टक्के लागला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तो किंचित कमी आहे. सीता बाल विद्या मंदिर इंटर कॉलेजची विद्यार्थी प्राची निगम हिने परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला. तिला ९८.५० टक्के (६०० पैकी ५९१ गुण) मिळाले. तिला आयआयटी-जेईई उत्तीर्ण होऊन इंजिनीअर व्हायचे आहे.
प्राचीने गणित, विज्ञान आणि ड्रॉइंग या तीन विषयांत परिपूर्ण गुण मिळवले. इंग्रजी, हिंदी आणि सोशल स्टडीजमध्ये तिला ९७ गुण मिळाले. बोर्डाचा निकाल पाहिल्यानंतर आपण जगात अव्वल असल्याचे प्राचीने सांगितले. प्राची म्हणाली की, विद्यार्थी नियमित वर्गात हजर राहिल्यास त्याला परीक्षेत उतीर्ण होण्यापासून कोणीच रोखू शकत नाहीत. प्राची वाचनाची आवड आहे. तिला लोकांशी संवाद साधायला, घरात भावंडांसोबत बॅडमिंटन खेळायला खूप आवडतं.