Sex festival in south korea cancelled : आशिया खंडातील महत्वाचा देश असणारा दक्षिण कोरियाने पहिला आणि जगातील सर्वात मोठा सेक्स फेस्टिव्हल आयोजित केला होता. या फेस्टिव्हलमध्ये जपानी पॉर्न स्टार्सना आमंत्रित करण्यात आले होते. तर यात सेक्स क्रीडा स्पर्धा आणि सेक्स टॉयचे प्रात्यक्षिकं यासह विविध कार्यक्रमांचा समावेश होता. मात्र, सेक्स फेस्टिव्हलवरून गदारोळ झाल्याने हा फेस्टिव्हल सुरू होण्याच्या अवघ्या २४ तासांआधी रद्द करण्यात आला. या फेस्टिव्हलचे तिकीट खरेदी करणाऱ्यामध्ये पुरुषांशी संख्या जास्त असल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
सार्वजनिक ठिकाणी ओपन सेक्स संदर्भात पुराणमतवादी दृष्टिकोन बाळगणाऱ्या दक्षिण कोरियाला यावेळी सेक्स फेस्टिव्हलकडून मोठ्या अपेक्षा होत्या. या सेक्स फेस्टिव्हलसाठी जपानी पॉर्न स्टार्सना खास आमंत्रित करण्यात आले होते. या स्टार्सना पाहण्यासाठी हजारो लोक सेक्स फेस्टसाठी उपस्थित राहतील अशी आयोजकांची अपेक्षा होती. या फेअरमध्ये फॅशन शो, सेक्स टॉय प्रदर्शन आणि सेक्स क्रीडा स्पर्धांचाही समावेश होता. मात्र, हा फेस्टिव्हल होण्याच्या अवघ्या २४ तासांआधी अचानक हा सोहळा रद्द करण्यात आला आहे.
दक्षिण कोरियामध्ये लैंगिक आणि सेक्स मनोरंजनाबद्दल पुराणमतवादी दृष्टीकोन आहे. या प्रकारचे कार्यक्रम आणि सोहळ्यांवर सार्वजनिक ठिकाणी बंदी आहे. तसेच एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त पॉर्न-आधारित साहित्याची विक्री देखील बेकायदेशीर आणि प्रतिबंधित आहे. या फेस्टिव्हलच्या आयोजकांपैकी एक असलेल्या ली हाय-ताई म्हणाले, "जवळजवळ प्रत्येक देशात सेक्स फेस्टिव्हल होत असतो, पण दक्षिण कोरियामध्ये अशी संस्कृती नाही. मला या प्रकारच्या सेक्स फेस्टिव्हलचे आयोजन करून देशात इतिहास रचायचा होता.
ली हाय-ताई यांची कंपनी PlayJoker ही कायदेशीर बाबी सांभाळून पॉर्न तयार करते तसेच या संबंधीचे अनेक कार्यक्रम कंपनीने दक्षिण कोरियामध्ये आयोजित करण्यास सुरुवात केली होती.
सेक्स फेस्टिव्हल आयोजित करण्याच्या महिनाभरापूर्वीच देशभरात गदारोळ सुरू झाला होता. एका महिला हक्क संघटनेने जिथे हा महोत्सव होणार होता त्या सुवॉन शहरात या फेस्टिव्हल विरोधात निदर्शने केली होती. या संघटनेने ली ही ताई आणि त्याच्या कंपनीवर महिलांचे शोषण केल्याचा आरोप देखील केला होता. हा सोहळा स्त्री-पुरुषांसाठी नाही. या फेस्टिव्हलचे तिकीट खरेदी करणारे बहुसंख्य केवळ पुरुष आहेत, असे संघटनेचे मत आहे.
शहराच्या महापौरांनीही हा महोत्सव एका प्राथमिक शाळेजवळ आयोजित केला जात असल्याने यावर टीका केली होती. तर काही अधिकाऱ्यांनी कार्यक्रम आयोजित केल्यास कंपनीचा परवाना रद्द करण्याची धमकी देखील दिली होती. ही धमकी प्रभावी ठरली आणि प्ले जोकर कंपनीला कार्यक्रम रद्द करावा लागला.