मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Whatsapp : व्हॉट्सअ‍ॅप वापरणं आता आणखी सोपं आणि सुरक्षित; हे नवं फीचर वापरून पाहाच!

Whatsapp : व्हॉट्सअ‍ॅप वापरणं आता आणखी सोपं आणि सुरक्षित; हे नवं फीचर वापरून पाहाच!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 25, 2024 12:09 PM IST

whatsapp passkeys feature : व्हॉट्सअ‍ॅप वापरणं आता अधिक सोप्पं आणि सुरक्षित होणार आहे. यासाठी व्हॉट्सअ‍ॅपनं आणलेलं नवं खास फीचर मदत करणार आहे.

आता फिंगरप्रिंट आणि फेसआयडीच्या मदतीनं सुरू होणार व्हॉट्सअ‍ॅप; असं वापरा नवीन फीचर
आता फिंगरप्रिंट आणि फेसआयडीच्या मदतीनं सुरू होणार व्हॉट्सअ‍ॅप; असं वापरा नवीन फीचर

whatsapp passkeys feature : जगातील सध्याचे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp नं जवळपास संपूर्ण जग कवेत घेतलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या सार्वत्रिकीकरणाबरोबरच त्यातील वैयक्तिक चॅटच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. याचाच विचार करून कंपनीकडून वेळोवेळी नवनवे सुरक्षा फीचर आणले जातात. याच मालिकेतील नवा सुरक्षा पर्याय आता ग्राहकांना मिळणार आहे. त्यानुसार युजर्सना आता पासवर्डऐवजी फिंगरप्रिंट किंवा फेसआयडीद्वारे लॉग इन करता येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपनं iOS युजर्ससाठी PassKeys हे वैशिष्ट्य आणलं आहे. पास-की फीचर मिळाल्यानंतर युजर्सना लॉगिनसाठी त्यांचा पासकोड किंवा कोणताही पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नाही. या पास-कीच्या मदतीनं बायोमेट्रिक ओळखीसह सहजरित्या लॉगिन करता येईल आणि ॲप हॅक होण्याची भीतीही राहणार नाही. अँड्रॉइड युजर्सना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच हा पर्याय मिळाला होता. आता iOS युजर्सनाही ही सुविधा मिळणार आहे.

…म्हणून पास-की हा एक चांगला पर्याय

सायबर गुन्हे आणि डेटा चोरी यांसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये सातत्यानं सुधारणा होत आहे, परंतु बहुतेक पासवर्ड-आधारित सेवांचा पासवर्ड लीक होण्याची भीती कायम आहे. पास-की हा एक सोपा आणि चांगला मार्ग आहे. त्यामुळं युजर्सला फिंगरप्रिंट आणि फेसआयडी सारखे पर्याय उपलब्ध होतात. फेसआयडी किंवा फिंगरप्रिंटच्या मदतीनं लॉगिन करताना ६ अंकी पासवर्ड टाकावा लागत नाही आणि तो लक्षात ठेवावा लागत नाही.

सर्वात मोठा फायदा

पास-कीशी संबंधित सर्वात मोठा फायदा म्हणजे तो लक्षात ठेवण्याची कोणतीही अडचण नाही. याशिवाय, ते वापरण्यास सोपं आहे आणि कोणत्याही लांबलचक प्रक्रियेतून जाण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला हवे तेव्हा मेसेजिंग ॲपवर जाऊन तुम्ही पास-की काढू शकता.

कसं वापरायचं पास-की फीचर?

> सर्वात आधी व्हॉट्सॲपचं लेटेस्ट व्हर्जन अपडेट करा आणि ते उघडा.

> यानंतर सेटिंगमध्ये जा आणि अकाउंट ऑप्शनवर टॅप करा.

> इथं पास-कीज पर्यायावर टॅप केल्यानंतर, स्क्रीनवर दर्शविलेल्या सूचनांचे अनुसरण करा. त्यानंतर पास-की सेट करता येईल.

> आता लॉग इन करताना तुम्हाला कोणताही पासवर्ड विचारला जाणार नाही आणि तुम्ही फक्त फिंगरप्रिंट किंवा फेसआयडीद्वारे लॉग इन करू शकता.

WhatsApp channel

विभाग