OnePlus 11 On Massive Discount: वनप्लस ११ सध्या अॅमेझॉनवर आकर्षक किंमतीत उपलब्ध आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये लॉन्च करण्यात आलेला हा फोन शक्तिशाली स्नॅपड्रॅगन ८ जेन २ प्रोसेसरसह सर्वात स्वस्त स्मार्टफोनपैकी एक आहे. अॅमेझॉनवर सुरु असलेल्या ऑफर्समध्ये वनप्लस ११ हा स्मार्टफोन २० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. तर, अॅमेझॉनवर सुरू असलेल्या या ऑफर्सबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या वनप्लस ११ ची मूळ किंमत ५६ हजार ९९९ रुपये होती. मात्र, अॅमेझॉनच्या विशेष सवलतीमुळे ही किंमत १२ टक्क्यांनी कमी होऊन ती ४९ हजार ९९९ रुपयांवर आली आहे. एचडीएफसी बँकेच्या डेबिट कार्डधारकांना ईएमआय ट्रान्झॅक्शनवर ३ हजार २५० रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळेल, जर ग्राहक ४८ हजार ४४९ रुपयांची खरेदी करतात.
याशिवाय, अॅमेझॉनच्या एक्सचेंज ऑफरमुळे तुम्हाला तुमच्या जुन्या मोबाइल फोनवर २७ हजार ६०० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते, ज्यामुळे डील आणखी गोड होऊ शकते. मात्र, ही किंमत जुन्या फोनच्या कंडिशनवर अवलंबून असेल.
वनप्लस ११ मध्ये स्नॅपड्रॅगन ८ जेन २ चिपसेट देण्यात आला आहे, जो उत्कृष्ट कामगिरी करतो. फोनमध्ये १०० वॅट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसपोर्टसह ५ हजार एमएएचची दमदार बॅटरी आहे. म्हणजेच हा स्मार्टफोन अवघ्या ३० मिनिटांत ० ते १०० टक्के चार्ज होतो. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल-लेन्स रियर कॅमेरा मिळतो, ज्यात ५० मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, ४८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि ३२ मेगापिक्सलचा टेलिफोटो सेन्सरचा समावेश आहे. या स्मार्टफोनद्वारे ६० एफपीएसपर्यंत 4K व्हिडिओ रेकॉर्ड केला जाऊ शकतो.
वनप्लस ११ हा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. अॅमेझॉनवर वनप्लस ११ मोठ्या सवलतीत उपलब्ध झाला आहे. अॅमेझॉनवर वनप्लस व्यतिरिक्त आणखी बऱ्याच स्मार्टफोनच्या खरेदीवर सूट दिली जात आहे.
संबंधित बातम्या