मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Samsung Galaxy F15: कमी किंमतीत जास्त फीचर्स हवेत? सॅमसंगनं आणलाय जबरदस्त स्मार्टफोन

Samsung Galaxy F15: कमी किंमतीत जास्त फीचर्स हवेत? सॅमसंगनं आणलाय जबरदस्त स्मार्टफोन

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 19, 2024 09:43 PM IST

Samsung Galaxy F15 Launched In India: सॅमसंगने आपला नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी एफ १५ भारतात लॉन्च केला आहे.

सॅमसंग कंपनीने त्यांचा नवी स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी एफ १५ भारतात लॉन्च केला आहे.
सॅमसंग कंपनीने त्यांचा नवी स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी एफ १५ भारतात लॉन्च केला आहे. (Samsung)

Samsung Mobile Under 20000: सॅमसंगने भारतात आपल्या गॅलेक्सी एफ १५ स्मार्टफोन लाइनअपमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या नवीन व्हेरिएंटसह भारतात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन इतर व्हेरिएंटसह आधीच बाजारात उपलब्ध होता. सॅमसंग गॅलेक्सी एफ १५ एफएचडी+ डिस्प्लेसह येतो आणि मीडियाटेक डायमेंसिटी चिपसेटद्वारे संचालित आहे. यात ५० मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा असून ६ हजार एमएएच क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली.

Realme Upcoming Phones: तगड्या फीचर्ससह रिअलमीचे 'हे' दोन फोन लवकरच बाजारात; काय-काय मिळणार?

किंमत आणि उपलब्धता

सॅमसंग गॅलेक्सी एफ १५ च्या नवीन लॉन्च केलेल्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरियंटची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. अ‍ॅश ब्लॅक, ग्रोवी व्हायोलेट आणि जॅझी ग्रीन कलर ऑप्शनमधून निवड करण्याचा पर्याय आहे. ४ जीबी व्हेरिएंटची किंमत १२ हजार ९९९ रुपये आहे. तर, ६ जीबी व्हेरिएंटची किंमत १४ हजार ४९९९ रुपये आहे. इच्छुक खरेदीदार फ्लिपकार्टच्या माध्यमातून ऑनलाइन या स्मार्टफोनची खरेदी करू शकतात. तसेच देशभरातील अधिकृत किरकोळ स्टोअरमध्ये जाऊ शकतात.

OnePlus 11 price drops : वनप्लस ११ च्या किंमतीत पुन्हा घसरण, जाणून घ्या नवी किंमत आणि बँक ऑफर!

सॅमसंग गॅलेक्सी एफ १५ मधील फीचर्स

सॅमसंग गॅलेक्सी एफ १५ मध्ये ६.६ इंचाचा एफएचडी+ डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन १०८०x२३४० पिक्सेल आणि ९०हर्ट्झ रिफ्रेश रेट आहे. यात ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी ६१००+ चिपसेट देण्यात आला आहे, जो ८ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज ऑफर करतो, जो मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येतो. सॅमसंगच्या वन यूआय ६ ओव्हरलेसह अँड्रॉइड १४ ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारा सॅमसंग गॅलेक्सी एफ १५ मध्ये चार वर्षांचे अँड्रॉइड ओएस अपडेट आणि पाच वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स दिले जातात.

फोटोग्राफीच्या बाबतीत यात एफ/१.८ अपर्चरसह ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, एफ /२.२ अपर्चरसह ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि एलईडी फ्लॅशसह एफ / २.४ अपर्चरसह २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सरसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी युजर्स १३ मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याचा आधार घेऊ शकतात. याव्यतिरिक्त, डिव्हाइसमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे आणि २५ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६ हजार एमएएचची बॅटरी आहे.

WhatsApp channel

विभाग