मराठी बातम्या  /  बिझनेस  /  iPhone 14: संधी सोडू नका, आयफोन १४ मिळवा अवघ्या ३३ हजार ४०० रुपयांत, अ‍ॅमेझॉनची भन्नाट ऑफर!

iPhone 14: संधी सोडू नका, आयफोन १४ मिळवा अवघ्या ३३ हजार ४०० रुपयांत, अ‍ॅमेझॉनची भन्नाट ऑफर!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 13, 2024 04:27 PM IST

Amazon Sale: ई-कॉमर्स वेबसाईट अ‍ॅमेझॉनने आयफोन चाहत्यांसाठी भन्नाट ऑफर आणली आहे.

अ‍ॅमेझॉन या ऑफरमुळे अनेकांचे आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न साकार होऊ शकते.
अ‍ॅमेझॉन या ऑफरमुळे अनेकांचे आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. (Amritanshu / HT Tech)

iPhone 14 Offer Details: अ‍ॅपल आयफोन १४ लॉन्च झाल्यापासून स्मार्टफोन प्रेमींसाठी लोकप्रिय पर्याय बनला आहे. आता, अ‍ॅमेझॉन या डिव्हाइसवर एक शानदार डील ऑफर करत आहे, ज्यामुळे संभाव्य खरेदीदारांना अगदी स्वस्तात आयफोन १४ खरेदी करता येऊ शकतो. अ‍ॅमेझॉनच्या ऑफर्सबद्दल जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

अ‍ॅमेझॉनवर आयफोन १४ सध्या ६९ हजार ९०० रुपयांना लिस्ट झाला आहे. मात्र, आयफोन १४ च्या खरेदीवर ग्राहकांना १० टक्के डिस्काउंट दिले जात आहे. म्हणजेच ग्राहक हा फोन ६२ हजार ८०० रुपयांत खरेदी करू शकता. एवढेच नाहीतरआयफोन १४ च्या खरेदीवर ग्राहकांना एक्स्चेंज ऑफर मिळत आहे. यामुळे ग्राहकांना ३० हजारांपेक्षा अधिक रुपयांची बचत करता येणार आहे. परंतु, एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारी सवलत तुमच्या जुन्या फोनची स्थिती आणि ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असेल.

Infinix Note 40 Pro Series: इनफिनिक्स नोट ४० प्रो सीरिज भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत!

बँक ऑफर्स

अ‍ॅमेझॉन बँक ऑफरच्या माध्यमातून अतिरिक्त बचत देखील देत आहे. क्रेडिट कार्डवर ३ हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. ज्यामुळे आयफोन १४ ची किंमत आणखी कमी होईल. याशिवाय, नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय उपलब्ध आहे. ज्यामुळे क्रेडिट कार्डवरील ईएमआय व्याज बचतीत २ हजार ८२७ रुपयांची बचत होऊ शकते.

iPhone 16: 'या' दोन नव्या रंगात आयफोन १६ बाजारात दाखल होणार, लॉन्चिंगपूर्वीच माहिती लीक!

पार्टनर ऑफर्स

Flash.co ईमेल आयडीवर स्विच केल्यास तुम्हाला अतिरिक्त २५० रुपयांची सूट मिळू शकते, ज्यामुळे या खरेदीवरील एकूण बचतीत भर पडते.

आयफोन 14 फीचर्स

आयफोन १४ मध्ये १५.४० सेमी (६.१ इंच) सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहे. याची अ‍ॅडव्हान्स कॅमेरा सिस्टीम कोणत्याही परिस्थितीत चांगल्या फोटोंचे आश्वासन देते, ज्यात 4K डॉल्बी व्हिजनमध्ये ३० एफपीएसपर्यंत सिनेमॅटिक मोड आणि व्हिडिओसाठी अ‍ॅक्शन मोडसारखे फीचर्स आहेत. आयफोन १४ मध्ये सुरक्षेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. हे क्रॅश डिटेक्शन तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे जे आवश्यकतेनुसार आपोआप मदतीसाठी कॉल करते. याव्यतिरिक्त, डिव्हाइस संपूर्ण दिवस बॅटरी लाइफ आणि 20 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅकची हमी देते.

अ‍ॅमेझॉनवरील अ‍ॅपल आयफोन १४ वरील सध्याची ऑफर ही सवलतीच्या दरात शक्तिशाली आणि फीचरपॅक्ड स्मार्टफोनमध्ये अपग्रेड करण्याची उत्तम संधी आहे.

WhatsApp channel

विभाग