T20 World Cup 2024: वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत आगामी टी-२९ विश्वचषकाची स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठी वेस्ट इंडिजने आपला संघ जाहीर केला. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने कर्णधारपदाची जबाबदारी रोव्हमन पॉवेल याच्या खांद्यावर सोपवली आहे. तर वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफला उपकर्णधारपद देण्यात आले. निकोलस पूरन, आंद्रे रसेल आणि जेसन होल्डर या अनुभवी खेळाडूंचाही या संघात समावेश करण्यात आला.२०२२ मध्ये खेळण्यात आलेल्या टी-२० विश्वचषकात वेस्ट इंडीजचा संघ पात्र ठरला नव्हता. मात्र, यंदाच्या विश्वचषकात वेस्ट इंडीजच्या संघाने पात्रता मिळवली.
उदयोन्मुख वेगवान गोलंदाज शमर जोसेफने वेस्ट इंडिजच्या टी-20 विश्वचषक संघात स्थान मिळवले. यावर्षी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. याचबरोबर शिमरॉन हेटमायर वेस्ट इंडीजच्या संघात पुनरागमन झाले. तो गेल्या दोन महिन्यापासून टी-२० संघाचा भाग नव्हता. रोमारियो शेफर्ड, जॉन्सन चार्ल्स आणि शे होप या तुफानी फलंदाजांनाही या संघात स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे, विस्फोटक फलंदाज कायल मेयर्सला संघात स्थान देण्यात आले नाही. वेस्ट इंडिज आतापर्यंत दोनदा टी-२० वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. वेस्ट इंडीजने २०१२ आणि २०१६ मध्ये खेळण्यात आलेल्या टी-२० विश्वचषकावर नाव कोरले.
आगामी टी-२० विश्वचषकात वेस्ट इंडीजचा संघाला क गटात ठेवण्यात आले. या गटात न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पापुआ न्यू गिनी आणि युगांडा यांचाही समावेश असेल.वेस्ट इंडीज त्यांचा पहिला सामना पापुआ न्यू गिनीविरुद्ध २ जून रोजी खेळेल.
रोव्हमन पॉवेल (कर्णधार), जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, ब्रँडन किंग, शाई होप, निकोलस पूरन, शेरफान रदरफोर्ड, आंद्रे रसेल, रोमॅरियो शेफर्ड, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ (उपकर्णधार) ), अकील हुसेन, गुडाकेश मोटिये, शामर जोसेफ.
संबंधित बातम्या