मराठी बातम्या  /  बिझनेस  /  OnePlus 11 price drops : वनप्लस ११ च्या किंमतीत पुन्हा घसरण, जाणून घ्या नवी किंमत आणि बँक ऑफर!

OnePlus 11 price drops : वनप्लस ११ च्या किंमतीत पुन्हा घसरण, जाणून घ्या नवी किंमत आणि बँक ऑफर!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 15, 2024 06:08 PM IST

OnePlus 11 Price Cut: भारतात वनप्लस ११ च्या किंमतीत आणखी एक कपात करण्यात आली आहे.

भारतात वनप्लस ११ स्मार्टफोनच्या किंमतीत आणखी कपात करण्यात आली आहे.
भारतात वनप्लस ११ स्मार्टफोनच्या किंमतीत आणखी कपात करण्यात आली आहे. (OnePlus)

OnePlus 11 price drops again in India: वनप्लसने आपला प्रीमियम स्मार्टफोन वनप्लस ११ च्या किंमतीत आणखी घट करून भारतीय ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नव्हेतर, या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना आकर्षक अशी बँक ऑफर मिळत आहे. वनप्सल ११ च्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरज असलेल्या व्हेरिएंटच्या खरेदीवर ग्राहक आणखी पैशांची बचत करू शकतात. या व्हेरिएंटमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन २ चिपसेट देण्यात आला असून यात १०० वॅट फास्ट चार्जिंग क्षमतेसह ५ हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली.

ट्रेंडिंग न्यूज

iPhone 14: संधी सोडू नका, आयफोन १४ मिळवा अवघ्या ३३ हजार ४०० रुपयांत, अ‍ॅमेझॉनची भन्नाट ऑफर!

फोनच्या किंमतीत दुसऱ्यांदा घसरण

वनप्लस ११ च्या ८ जीबी रॅम व्हेरियंटच्या किंमतीत सातत्याने घसरण होत आहे. सुरुवातील या स्मार्टफोनच्या मूळ किंमतीत दोन हजार रुपयांची कपात करण्यात आली होती. यानंतर आता आणखी तीन हजार रुपयांची कपात केली आहे. यामुळे ग्राहकांना वनप्लस (८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज) अवघ्या ५१ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकतो.

Infinix Note 40 Pro Series: इनफिनिक्स नोट ४० प्रो सीरिज भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत!

बँक ऑफर्स

हा फोन टायटन ब्लॅक आणि इटर्नल ग्रीन अशा दोन रंगात उपलब्ध आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. ग्राहक आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँक कार्डचा वापर करून आणखी ३ हजार रुपये वाचवू शकतात.

वनप्लस ११ फीचर्स

वनप्लस ११ मध्ये ६.७ इंचाचा क्वाड एचडी+ डिस्प्ले आहे, जो १४४० x  ३२१६ पिक्सलचा शार्प रिझोल्यूशन मिळतो, त्याचे एमोलेड पॅनेल सिल्की १२०  हर्ट्झ रिफ्रेश रेट सुनिश्चित करते. या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात सोनी आयएमएक्स ८९० सेन्सर आणि एफ / १.८ अपर्चरसह ५० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, सोनी आयएमएक्स ५८१ सेन्सर आणि एफ / २.२ अपर्चर सह ४८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि ३२ मेगापिक्सल आरजीबीडब्ल्यू टेलिफोटो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी डिस्प्लेमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये मिळणारी ५ हजार एमएएच क्षमतेची बॅटरी अवघ्या २५ मिनिटात पूर्ण चार्ज होते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

WhatsApp channel

विभाग