मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Infinix Note 40 Pro Series: इनफिनिक्स नोट ४० प्रो सीरिज भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत!

Infinix Note 40 Pro Series: इनफिनिक्स नोट ४० प्रो सीरिज भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 12, 2024 11:35 PM IST

Infinix Note 40 Pro Series: नवीन इनफिनिक्स नोट ४० प्रो सीरिज आज वायरलेस चार्जिंगसह भारतात लॉन्च करण्यात आली.

इनफिनिक्स नोट ४० प्रो सीरिज भारतात लॉन्च झाली आहे.
इनफिनिक्स नोट ४० प्रो सीरिज भारतात लॉन्च झाली आहे. ( Infinix )

Infinix Note 40 Pro Series Launched In India: इन्फिनिक्सने आपला मिड रेंज स्मार्टफोन इनफिनिक्स नोट ४० प्रो सीरिज भारतात लॉन्च केला आहे. या सीरिजमध्ये इनफिनिक्स नोट ४० प्रो आणि इनफिनिक्स नोट ४० प्रो प्लसचा समावेश आहे. लॉन्चिग सोबतच इन्फिनिक्स लॉन्चिंगच्या तारखेपूर्वी स्मार्टफोन बुक करणाऱ्या लोकांसाठी एक्सक्लुझिव्ह ऑफर्स देत आहे. कंपनी ४ हजार ९९९ रुपयांचे मॅगसेफ किट मोफत मिळत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

iPhone 16: 'या' दोन नव्या रंगात आयफोन १६ बाजारात दाखल होणार, लॉन्चिंगपूर्वीच माहिती लीक!

इनफिनिक्स नोट ४० प्रो आणि नोट 40 प्रो प्लस मध्ये 6.78 इंचाचा 3 डी कर्व्ड एमोलेड डिस्प्ले आहे, ज्यात १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १३०० निट्स पीक ब्राइटनेस आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७०५० 5G चिपसेट आणि आयएमजी बीएक्सएम ८-२५६ जीपीयू देण्यात आला आहे. यात ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून यामध्ये १०८ मेगापिक्सलचा ओआयएस सुपर-झूम कॅमेरा, २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंटमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Vivo T3x 5G Launch Date: विवो टी३ एक्स ‘या’ दिवशी होतोय लॉन्च, १५ हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळवा दमदार फीचर्स

इनफिनिक्स नोट ४० प्रो मध्ये ५ हजार एमएएच बॅटरी आहे, जी ४५ वॅट मॅक्स फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. दुसरीकडे, इनफिनिक्स नोट ४० प्रो प्लस १०० वॅट चार्जिंग सपोर्टसह ४ हजार ६०० एमएएच बॅटरीसह येतो. या स्मार्टफोनमध्ये मॅगसेफ वायरलेस चार्जिंग, अॅक्टिव्ह हॅलो व्हॉईस असिस्टंट आणि इतर फीचर्स देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, नोट ४० प्रो प्लस आणि नोट ४० प्रो अँड्रॉइड १४ वर आधारित एक्सओएस १४ वर चालतात.

किंमत

इनफिनिक्स नोट ४० प्रो मध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज आहे आणि त्याची किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे. इनफिनिक्स नोट ४० प्रो प्लस १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह येतो ज्याची किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे. इनफिनिक्स नोट ४० प्रो 5G सीरिज ऑब्सिडियन ब्लॅक, टायटन गोल्ड आणि विंटेज ग्रीन या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर आज दुपारी १२ वाजल्यापासून नवीन इनफिनिक्स स्मार्टफोनची विक्री सुरू झाली आहे.

WhatsApp channel

विभाग