मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Vivo T3x 5G Launch Date: विवो टी३ एक्स ‘या’ दिवशी होतोय लॉन्च, १५ हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळवा दमदार फीचर्स

Vivo T3x 5G Launch Date: विवो टी३ एक्स ‘या’ दिवशी होतोय लॉन्च, १५ हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळवा दमदार फीचर्स

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 11, 2024 04:29 PM IST

Smartphone Under 15000: विवो टी३ एक्स 5G भारतात पुढच्या आठवड्यात रोजी लॉन्च होणार आहे.

विवो टी३ एक्स 5G स्मार्टफोन येत्या १७ एप्रिलला भारतात लॉन्च होणार आहे, ज्याची किंमत १५ हजारांपेक्षा कमी आहे.
विवो टी३ एक्स 5G स्मार्टफोन येत्या १७ एप्रिलला भारतात लॉन्च होणार आहे, ज्याची किंमत १५ हजारांपेक्षा कमी आहे. (Flipkart)

Vivo T3x 5G Launch Date Confirmed: विवो टी 3 एक्स 5G गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. फ्लिपकार्टच्या मायक्रोसाईटवरून विवो टी३एक्सच्या लाँचिंगची तारीख निश्चित करण्यात आली आहे. भारतात १७ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १२ वाजता या स्मार्टफोनची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. लॉन्चिंगच्या तारखेसोबतच विवो टी३ एक्स 5G फीचर्स लीक झाले आहेत. तर, स्मार्टफोनमध्ये कोणते फीचर्स मिळणार, हे जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

iPhone vs Samsung: आयफोन १५ किंवा सॅमसंग गॅलेक्सी एस २४, कोणत्या स्मार्टफोनने बाजारात घातलाय धुमाकूळ

फ्लिपकार्टच्या मायक्रोसाइटनुसार विवो टी३ एक्स 5G येत्या १७ एप्रिल २०२४ रोजी लॉन्च करण्यात येणार आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट-एक्सक्लुझिव्ह डिव्हाइस असण्याची शक्यता आहे. मात्र, हा स्मार्टफोन विवो वेबसाइट आणि इतर रिटेल स्टोअर्सवरही उपलब्ध असेल. फ्लिपकार्टने जाहीर केलेल्या डिझाइनच्या बाबतीत, विवो टी३ एक्समध्ये ड्युअल कॅमेरा सेन्सर आणि एलईडी फ्लॅशसह गोलाकार कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. विवोने सेलेस्टिअल ग्रीन आणि सेलेस्टिअल ब्लिस अशा दोन रंगांमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

Redmi Turbo 3: चक्क १० हजार एमएएचची बॅटरी; रेडमी टर्बो ३ उद्या बाजारात दाखल होतोय, जाणून घ्या किंमत

तीन स्टोरेज व्हेरियंटसह लॉन्च होण्याची शक्यता

विवो टी३ एक्स 5G क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६ जेन १ एसओसीसह लॉन्च होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त असाही दावा केला जात आहे की, स्मार्टफोनमध्ये एड्रेनो जीपीयू देखील असू शकतो. ९१ मोबाइल्सच्या रिपोर्टनुसाि्, विवो टी ३ एक्समध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७२ इंचाचा एफएचडी+ डिस्प्ले असण्याची शक्यताआहे. हा स्मार्टफोन ४ जीबी + १२८ जीबी स्टोरेज, ८ जीबी + १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी + १२८ जीबी स्टोरेज अशा तीन स्टोरेज व्हेरियंटमध्ये येण्याची शक्यता आहे.

कॅमेरा आणि बॅटरी

फोटोग्राफीसाठी विवो टी३एक्स 5G मध्ये ५० मेगापिक्सलप्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर सपोर्ट करू शकतो. फोनच्या फ्रंटमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, ६००० एमएएच बॅटरी आणि ४४ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन १५००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च करण्यात येणार आहे.

WhatsApp channel

विभाग