Oppo A3 Pro: ओप्पो ए३ प्रोची भारतात किती असेल किंमत? जाणून घ्या नुकताच लॉन्च झालेल्या स्मार्टफोनबद्दल!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Oppo A3 Pro: ओप्पो ए३ प्रोची भारतात किती असेल किंमत? जाणून घ्या नुकताच लॉन्च झालेल्या स्मार्टफोनबद्दल!

Oppo A3 Pro: ओप्पो ए३ प्रोची भारतात किती असेल किंमत? जाणून घ्या नुकताच लॉन्च झालेल्या स्मार्टफोनबद्दल!

Apr 22, 2024 09:59 PM IST

Oppo A3 Pro Price: ओप्पो ए३ प्रो नुकताच चीनमध्ये लॉन्च झाला. या स्मार्टफोनची भारतात किती किंमत असेल? हे जाणून घ्या.

सुपरफास्ट चार्जिंगसह ओप्पो ए३ प्रो लवकरच भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे.
सुपरफास्ट चार्जिंगसह ओप्पो ए३ प्रो लवकरच भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. (Oppo )

Oppo A3 Pro Price and specifications: ओप्पो कंपनीचा नवा स्मार्टफोन ए३ १२ एप्रिल रोजी चीनी बाजारात लॉन्च झाला. लवकरच हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च होण्याची शक्यता आहे. २०२३ मध्ये देशात पदार्पण केलेल्या ए 2 प्रोनंतर हा नवीन रिलीज करण्यात आला. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७०५० चिपसेट आणि १२ जीबीपर्यंत रॅम मिळतो. या फोनला टिकाऊपणासाठी आयपी ६९ रेटिंग मिळाले आहे. ओप्पो ए३ प्रो स्मार्टफोनमधील फीचर्सबाबत जाणून घेऊयात.

चीनमधील इच्छुक खरेदीदार ओप्पोच्या ऑनलाइन स्टोअरमधून किंवा JD.com ओप्पो ए३ प्रो खरेदी करू शकतात. हा हँडसेट क्लाउड ब्रोकेड पावडर आणि माउंटेन ब्लू रंगात उपलब्ध आहे. भारतात स्मार्टफोन लाँच करण्याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.

Zomato वरून ऑर्डर करणे झाले महाग! तब्बल २५ टक्क्यांनी ऑर्डर बूकिंग रक्कम वाढली; ग्राहकांच्या खिशाला बसणार झळ

फीचर्स

ओप्पो ए३ प्रोमध्ये १०८० x २४१२ पिक्सल रिझोल्यूशनसह ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. याचा कर्व्ह्ड डिस्प्ले १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट प्रदान करतो आणि ९५० निट्सपर्यंतच्या पीक ब्राइटनेस लेव्हलपर्यंत पोहोचू शकतो. यात ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी ७०५० चिपसेट देण्यात आला, जो ८ जीबी रॅम/ २५६ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम/ ५१२ जीबी अशा दोन व्हेरियंटमध्ये येतो. कलरओएस १४ सह अँड्रॉइड १४ वर चालणारा हा फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो. ६४ एमपी मुख्य कॅमेरा आणि २ एमपी डेप्थ सेन्सरसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. फ्रंटमध्ये ८ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

Explainer : व्होडाफोन आयडियाचा एफपीओ आलाय! काय आहे ही संकल्पना? IPO आणि FPO मध्ये नेमका फरक काय असतो?

किंमत

ओप्पो ए३ प्रोच्या (८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज) बेस मॉडेलची किंमत १९९९ चीनी युआन म्हणजेच २३ हजार ४९० रुपयांपासून सुरू होते. तर, १२ जीबी रॅम आणि २५६ स्टोरेज असलेल्या या स्मार्टफोनची किंमत २ हजार १९९ चीनी युआन (२५ हजार ८३३ रुपये) इतकी आहे. १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज असलेल्या २ हजार ४९९ चीनी युआन (अंदाजे २८ हजार रुपये) इतकी आहे.

या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. या फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ओप्पो ए३ प्रो भारतात कधी दाखल होईल, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Whats_app_banner