PM kisan next installment : पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार? जाणून घ्या!-pm kisan 17th installment when will beneficiaries receive next installment ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PM kisan next installment : पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार? जाणून घ्या!

PM kisan next installment : पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार? जाणून घ्या!

Apr 24, 2024 04:23 PM IST

PM Kisan 17th Installment : शेतकऱ्यांना वर्षातून तीनदा अर्थसहाय्य देणाऱ्या पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार?
पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार? (PTI)

PM Kisan Yojana 17th Installment : देशातील शेतकऱ्यांच्या हाती हंगामाच्या सुरुवातीला काही रोकड असावी व त्याला शेतीसाठी लागणाऱ्या गरजेच्या वस्तू खरेदी करता याव्यात म्हणून सुरू करण्यात आलेल्या पीएम किसान योजनेचा पुढचा म्हणजेच १७ वा हप्ता मे महिन्यात कधीही येण्याची शक्यता आहे.

पीएम किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये मिळतात. आतापर्यंत या योजनेचे १६ हप्ते देण्यात आले आहेत. शेवटचा हप्ता २८ फेब्रुवारी २०२४ रोजी देण्यात आला होता. त्या अंतर्गत एकूण २१ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीचं वितरण करण्यात आलं होतं आणि ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ झाला होता.

पीएम किसान योजनेचा हप्ता दर चार महिन्यांनी दिला जातो. दरवर्षी एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर आणि डिसेंबर-मार्च अशा तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम दिली जाते. हप्ता जाहीर झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात. वर्षभरात एकूण ६ हजार रुपये दिले जातात. इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळत नाही.

पीएम किसान वेबसाइटनुसार, पीएम किसान योजनेत नोंदणीकृत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. ओटीपी आणि ई-केवायसी पीएम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा बायोमेट्रिक बीआरडी ई-केवायसीसाठी जवळच्या सीएससी केंद्रांशी संपर्क साधता येऊ शकतो.

लाभार्थी यादीत आपले नाव कसे तपासावे?

सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या

वेबसाइटवर गेल्यानंतर यादी' टॅबवर क्लिक करा.

ड्रॉप-डाऊनमधून निवडक राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव असे तपशील निवडा.

लाभार्थी यादीचा तपशील पाहण्यासाठी 'अहवाल मिळवा' टॅबवर क्लिक करा.

ई केवायसी ऑनलाइन कसे अपडेट करावे?

पीएम-किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि ईकेवायसी पर्यायावर क्लिक करा.

आधार कार्ड नंबर, कॅप्चा कोड टाका आणि सर्चवर क्लिक करा.

यानंतर आधार कार्डशी जोडलेला मोबाइल नंबर टाका.

'ओटीपी मिळवा' वर क्लिक करा आणि दिलेल्या बॉक्समध्ये ओटीपी प्रविष्ट करा.

Whats_app_banner
विभाग