Pankaja Munde Property : पंकजा मुंडे यांनी भाजप कडून बीड लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मंगळवारी त्यांनी शक्ति प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी सादर केलेल्या शपथ पत्रात त्यांची संपत्ती जाहीर केली आहे. यात त्यांनी त्यांच्या बँकेतील ठेवी, पतीच्या नावावर असलेली संपत्ती, सोनं, शेतजमीन, शेअर्स या बाबत माहिती सादर केली आहे. त्यानुसार पंकजा मुंडे व त्यांचे पती डॉ. चारुदत्त पालवे यांच्या संपत्तीत गेल्या काही वर्षात एकून १० कोटी ६७ लाख रुपयांची वाढ झाली असल्याचे दिसत आहे.
मुंडे या पाच वर्षांपासून आमदार किंवा मंत्री नसतांना देखील त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. या सोबतच त्याच्या डोक्यावर कर्ज देखील आहे. पंकजा मुंडे यांनी व त्यांचे पती डॉ. चारुदत्त पालवे यांनी डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्याकडून ६५ लाख तर यशश्री मुंडे यांच्याकडून ३५ लाखांचे कर्ज देखील घेतले आहे.
पंकजा मुंडे यांनी सादर केलेल्या शपथ पत्रात त्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ झालेली दिसते. तब्बल १० कोटीपेक्षा अधिक वाढ त्यांच्या संपत्तीत झाली आहे. त्यांच्या ऐकून संपत्ती बाबत बोलायचे झाल्यास ४६ कोटी ११ लाखांची संपत्ती मुंडे यांच्या कडे आहे, असे त्यांनी शपथ पत्रात संगितले आहे. पंकजा मुंडे यांच्या संपत्तीमध्ये गेल्या ५ वर्षात १० कोटी ६७ लाख रुपये वाढले आहेत. पंकजा मुंडे व त्यांचे पती चारुदत्त पालवे या दोघांच्या एकत्रित कर्जात देखील ९ कोटी ९४ लाखांची वाढ झाली. चारुदत्त पालवे यांनी डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्याकडून ६५ लाख तर यशश्री मुंडे यांच्याकडून ३५ लाखांचे कर्ज घेतले आहे.
भरताना पंकजा मुंडे यांच्या शपथपत्रानुसार पंकजा मुंडे यांच्याकडे ६ कोटी १७ लाख ५८ हजार ७०८ रुपयांची चलसंपत्ती असून वेगवेगळ्या बँकेत त्यांनी ठेवी देखील ठेवल्या आहेत. तर तसेच विविध कंपन्या व बँकेचे शेअर्स देखील त्यांच्या नावावर आहे. तर त्यांच्या कडे सोने देखील आहे.
पंकजा मुंडे यांच्याकडे सोने देखील आहे. त्यांच्या कडे ३२ लाख ८५ हजाराचे ४५० ग्रॅम सोने आहेत. ३ लाख २८ हजार रुपयांची ४ किलो चांदी तर २ लाख ३० हजारांचे इतर दागिने आहेत. पंकजा मुंडे यांचे पती डॉक्टर चारुदत्त पालवे यांच्याकडे १३ लाखांचे २०० ग्रॅम सोने तर १ लाख ३८ हजार रुपयांचे २ किलोची चांदी आहे.
बीड लोकसभा मतदार संघातून पंकजा मुंडे यांनी मंगळवारी त्यांचा उमेदवारी अर्ज दखल केला. यावेळी मोठे शक्ति प्रदर्शन देखील त्यांनी केले. त्यांच्या सोबत भाऊ धनंजय मुंडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. अर्ज भरण्यापूर्वी मुंडे यांनी पूजा केली. यानंतर आईचे आशीर्वाद घेत मुंडे भगिनीं गोपीनाथ गडावर गेल्या. यानंतर वैद्यनाथ ज्योतिर्लिंगांची विधीवत दर्शन त्यांनी घेतले. यानंतर त्यांनी मोठी रॅली काढत शक्ति प्रदर्शन केले.