Rudrapur Uttarakhand Viral News : लग्नाच्या वरातीत नाचण्यासाठी डिजेचे फॅड वाढले आहे. डीजेच्या लालवर अनेक जण नाचत गाजत मिरवणुकीत सहभागी होत असतात. मात्र, उत्तरराखंड येथील रुद्रपूर जिल्ह्यातील एका गावात लग्नातील हा डिजे वादाचे कारण ठरला. डीजेवर नाचणाऱ्यावरून असा वाद झाला की सगळेच थक्क झाले. स्टेजवर नटून थटून बसलेले वधू-वरही थक्क झाले. नाचण्याच्या वादातून दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये जोरदार राडा झाला. भर मांडवात लाथा-बुक्क्यांनी फ्रीस्टाईल हाणामारी झाली.
हा वाद इतका टोकाला गेला की, हे लग्न मोडावे लागले. या घटनेत वधू आणि वराच्या पक्षातील १० जण जखमी झाले. दोन्ही बाजूंच्या वडिलांनी समेट घडवून आणला. पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
किच्छा येथे राहणाऱ्या तरुणाचा रुद्रपूर येथील एका तरुणीशी लग्न ठरले होते. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास ही मिरवणूक आवास विकास येथे आली. लग्नाची मिरवणूक आल्यानंतर वराच्या बाजूचे लोक डीजेवर नाचत होते. दरम्यान, नियमानुसार दहा वाजल्यानंतर डीजे बंद करावा लागणार होता. वधूपक्षातील काही लोकांनी डीजे बंद करण्याची विनंती केली. यावरून लग्नातील काही पाहुणे संतापले. यामुळे दोन्ही पक्षात मोठा वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी दोन्ही पक्षांमध्ये जोरदार लाथा-बुक्क्याची हाणामारी झाली. ऐवढेच नाही तर एकमेकांन खुर्च्या देखील फेकून मारण्यात आल्या. त्यामुळे मांडवात मोठा गोंधळ उडाला. संतप्त झालेल्या पाहुण्यांनी मंडपाचे पडदे फाडले आणि खुर्च्याही तोडल्या.
या मारामारीत दोन्ही बाजूचे दहा जण जखमी झाले. लग्नाची सुरू असलेली तयारी ठप्प झाली. दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठांनी लग्नातील पाहुणे आणि कुटुंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत प्रकरण चांगलेच तापले होते.
लग्नाच्या मिरवणुकीत हाणामारी झाल्याची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. या सर्व वादात लग्नाची वेळ निघून गेली. शनिवारी वराच्या घरी आणखी एक लग्नसोहळा असल्याचे सांगण्यात येत आहे.
संपूर्ण वादानंतर लग्नाची मिरवणूक वधूशिवाय परतली. रुद्रपूरचे गृहनिर्माण विकास पोस्ट, अरविंद बहुगुणा यांनी सांगितले की, पोलिसांनी हल्लेखोरांना पोलिस कायद्यांतर्गत नोटिस दिली आहे. अखेर दोन्ही पक्षांनी समझोता करून हा वाद मिटवला. दोन्ही पक्षांच्या वडिलधाऱ्यांनी पुढील लग्नाबाबत एकमेकांशी बोलण्यास सांगितले आहे. मात्र, लग्नात प्रचंड गदारोळ झाल्यानंतर वरात ही नवरीला न घेताच मागे परतली.
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नात झालेल्या वादामुळे वराच्या बाजूने डीजेलाही मारहाण केली. यानंतर त्यांनी मंडपाचेही नुकसान केले आणि अन्नपदार्थही फेकून दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे वाद आणखी वाढला.
संबंधित बातम्या