Nagpur News : धक्कादायक! नागपूरच्या एनआयटीच्या स्विमिंग पूलमध्ये बडून तरुण प्राध्यापकाचा मृत्यू-highly educated youth dies after drowning in swimming pool in nagpur ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur News : धक्कादायक! नागपूरच्या एनआयटीच्या स्विमिंग पूलमध्ये बडून तरुण प्राध्यापकाचा मृत्यू

Nagpur News : धक्कादायक! नागपूरच्या एनआयटीच्या स्विमिंग पूलमध्ये बडून तरुण प्राध्यापकाचा मृत्यू

Apr 24, 2024 11:52 AM IST

Boy Drown in swimming pool in Nagpur : नागपूर येथे एका स्विमिंग पूलमध्ये एका उच्चशिक्षित युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली.

नागपूरच्या एनआयटीच्या स्विमिंग पूलमध्ये बडून तरुण प्राध्यापकाचा  मृत्यू
नागपूरच्या एनआयटीच्या स्विमिंग पूलमध्ये बडून तरुण प्राध्यापकाचा मृत्यू (HT)

Boy Drown in swimming pool in Nagpur : सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे. वाढत्या उन्हापासून दिलासा मिळावा या साठी अनेक जण जलतरण तलावात फोहण्यासाठी जातात. मात्र, नागपूर येथे जलतरण तलावात पोहणे एकाच्या जिवावर बेतले आहे. अंबाझरी येथील सुधार प्रन्यासच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

israel gaza news : गाझामध्ये इस्रायलनं केलेलं हत्याकांड उघड! हॉस्पिटलमधून सापडले तब्बल २०० मृतदेह

कुणाल किशोर साल्पेकर (वय ३६) असे स्विमिंग पूलात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा गेल्या दोन महिन्यांपासून स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी जात होता. मंगळवारी रात्री देखील हा तरुण पोहायला गेला होता. विशेष म्हणजे कुणालला चांगले पोहता येत होते. कुणाल मंगळवारी महमी प्रमाणे रात्री ८ च्या सुमारास पोहायला गेला होता. कुणाल हा पूलातील एका दोरीला पकडून पाण्यात खाली जाऊन वर येत होता. मात्र, पाण्याखाली जात असतांना त्याला अंदाज न आल्याने तो बुडायला लागला. त्याला पोहता येत असल्याने तो बाहेर येतील असे यावेळी उपस्थित असणाऱ्या इतरांना वाटले. मात्र तो वर न आल्याने लाईफगार्ड यांनी पाण्यात उडी मारली. त्यांनी कुणालला बाहेर काढले. त्याच्यावर त्यांनी प्रथमोपचार करून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणालने काहीच प्रतिसाद दिला नाही. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी आल्यावर कुणालला रुग्णवाहिकेतून तातडीने दवाखान्यात नेण्यात आले.

Nagpur News : नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांचा वापर करणे भोवले; शाळेवर कारवाईचे निवडणूक आयोगाचे आदेश

डॉक्टरांनी केले मृत घोषित

कुणालला दवाखान्यात भरती केल्यावर डॉक्टरांनी कुणाल साल्पेकर याकहा मृत्यू झाल्याचे घोषित केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साल्पेकर हा आयटी प्राध्यापक होता. तो अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शिकवत होता. मात्र, त्यांच्या मृत्यूमुळे एनआयटीच्या स्विमिंग पूलच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या ठिकाणी इतर जण पोहत असताना व लाईफगार्डने कुणाल बुडत असतांना तसेच या ठिकाणी लाईफ गार्ड असतांना देखील हा प्रकार कसं घडला या बद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

उन्हाळ्यामुळे स्विमिंग पूलमध्ये गर्दी; सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

सध्या उन्हाळा असल्याने स्विमिंग पूलमध्ये गर्दी आहे. लहान मुलेदेखील मोठ्या प्रमाणात पोहायला येतात. त्यातच असा प्रकार झाल्याने जलतरणपटूंच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षी देखील कळमेश्वर येथील स्विमिंग टँकमध्ये बुडून एका डॉक्टरचा मृत्यू झाला होता.

Whats_app_banner
विभाग