मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  israel gaza news : गाझामध्ये इस्रायलनं केलेलं हत्याकांड उघड! हॉस्पिटलमध्ये सापडले तब्बल २०० मृतदेह

israel gaza news : गाझामध्ये इस्रायलनं केलेलं हत्याकांड उघड! हॉस्पिटलमध्ये सापडले तब्बल २०० मृतदेह

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 24, 2024 12:03 PM IST

israel gaza news : गाझा पट्टीच्या खान युनिसमध्ये इस्रायली सैन्याने केलेल्या हल्ल्यात एका रुग्णालयात २०० नागरिक ठार मारल्याचा आरोप हमासने केला आहे. हॉस्पिटलमध्ये खोदकाम करताना २०० हून अधिक मृतदेह सापडले आहेत.

गाझामध्ये इस्रायलनं केलेलं हत्याकांड उघड! हॉस्पिटलमधून सापडले तब्बल २०० मृतदेह
गाझामध्ये इस्रायलनं केलेलं हत्याकांड उघड! हॉस्पिटलमधून सापडले तब्बल २०० मृतदेह

israel gaza news : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला २०० पेक्षा जास्त दिवस झाले आहे. गाझा शहरात इस्रायली सैन्याने केलेले हत्याकांड उघड झाले असून यामुळे अमेरिकाही संतप्त झाला आहे. अमेरिकेने इस्रायली सैनिकांच्या एका बटालियनवर निर्बंध जाहीर केले आहेत. दरम्यान, गाझामध्ये खान युनूस हॉस्पिटलमध्ये इस्रायली सैन्याने केलेल्या हल्ल्यात २०० पेक्षा अधिक नगरिकांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. येथे खोदकामात २०० हून अधिक मृतदेह सापडल्याचा आरोप हमासने केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Nagpur News : नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांचा वापर करणे भोवले; शाळेवर कारवाईचे निवडणूक आयोगाचे आदेश

इस्रायलने रुग्णालयाचं रूपांतर स्मशानभूमीत केल्याचा आरोप हमासनं केला आहे. इस्रायलच्या या क्रूरतेमुळे संयुक्त राष्ट्रही संतापला आहे. काही मृतदेहांचे हात बांधलेले होते तर काहींच्या अंगावर कपडेही नव्हते, असे हमासने म्हटले आहे.

इस्रायलच्या लष्कराने गाझा पट्टीतील शेकडो निरपराध नागरिकांना ठार मारले आहे. तसेच त्यांना हॉस्पिटलमध्ये पुरले, असा दावा हमासने केला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मृतदेह असल्याचा दावा हमासने केला आहे. मात्र, इस्रायली लष्कराने हमासचे केले आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. इस्त्रायली फौजा आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान, हमासने मारलेल्या पॅलेस्टिनींचे मृतदेह या ठिकाणी दफन केले होते, असे द टाइम्स ऑफ इस्रायलने वृत्त दिले आहे.

shikhar bank scam : शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवार, सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट

इस्रायल संरक्षण दलाने हमासचे आरोप फेटाळून लावले आहेत. आयडीएफच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की इस्रायली ओलिसांचा शोध घेत असलेल्या आमच्या सैन्याने नासेर हॉस्पिटलजवळ पॅलेस्टिनींनी पूर्वी दफन केलेल्या मृतदेहांची तपासणी केली आणि तपासणीनंतर ते मृतदेह त्याच ठिकाणी पुन्हा पुरण्यात आले होते.

काही मृतदेहांचे हात बांधलेले होते, तर काहींच्या अंगावर कपडेही नव्हते.

दुसरीकडे, संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाने दावा केला आहे की, रुग्णालयातील उत्खननादरम्यान सापडलेल्या मृतदेहांपैकी काहींचे हात बांधलेले होते तर काहींचे कपडे काढले होते. इस्रायलच्या आयडीएफने याचा विरोध करत अलीकडच्या काही महिन्यांत नासेर रुग्णालयाच्या परिसरात केलेल्या कारवाईदरम्यान, त्याच्या सैन्याने "इस्रायली ओलीस शोधण्यासाठी पॅलेस्टिनींनी हॉस्पिटलच्या मैदानावर पुरलेल्या मृतदेहांची तपासणी केली होती, असे म्हटले आहे.

IPL_Entry_Point