Love Brain issue: चीनमधील एका १८ वर्षीय तरुणीला 'लव्ह ब्रेन' नावाचा आजार झाल्याचे निदान झाले आहे. प्रेमाच्या भावनेचा तिच्यावर एवढा प्रभाव पडला की ती तिच्या प्रियकराला एक वेळा नाही तर तब्बल शेकडो वेळा दिवसातून फोन करायची. एवढेच नाही तर प्रियकर फोन उचलत नसल्यास ती मेसेज देखील करायची. एक दिवस तर तरुणीने हद्द ओलांडली. तिने १०० वेळा प्रियकराला फोन आणि मेसेज केले. मात्र, त्याने प्रतिसाद न दिल्याने तिने घरात गोंधळ घालायला सुरुवात केली. तीने बाल्कनीतून उडी मारण्याची धमकी दिल्याने प्रियकराने पोलिसांना बोलावले. दरम्यान, तरुणीची वैद्यकीय तपासणीनंतर तरुणीला लव्ह ब्रेन नावाचा आजार आल्याचे निष्पन्न झाले. बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डर ज्याला लव्ह ब्रेन असे संबोधले जाते. जाणून घेऊयात हा आजार काय आहे आणि कसा होतो?
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, शिओयू नावाच्या मुलीचे असे विचित्र वागणे तिच्या कॉलेजच्या दिवसांपासून सुरू झाले होते, जेव्हा ती पहिल्या वर्षात शिकत होती. रिपोर्टनुसार, ही तरुणी तिच्या प्रत्येक बाबतीत तिच्या प्रियकरांवर अवलंबून होती. छोट्या छोट्या गोष्टी देखील ती त्याच्याशी शेअर होती. ऐवढेच नाही तर तो कोठे आहे? काय करत आहे? हे जाणून घेण्यासाठी ती त्याला दिवसातून अनेक वेळा फोन आणि मेसेज करू लागली होती.
एक दिवशी शिओयूने हद्द केली. तिने तिच्या प्रियकराला एकाच दिवसात १०० पेक्षा जास्त फोन केले. मात्र, वैतागलेल्या प्रियकराने तिचा एक देखील फोन उचलला नाही. यामुळे शिओयू अस्वस्थ झाली. तिने घरात तोडफोड सुरू केली. ऐवढेच नाही तर तिने प्रियकराला आत्महत्या करण्याची धमकी दिली. यामुळे प्रियकराने थेट पोलिसांना बोलावले. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन शिओयूला ताब्यात घेतले. यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले. शिओयूच्या काही तपासण्या केल्यावर तिला लव्ह ब्रेन रोग झाल्याचे निदान झाले.
लव्ह ब्रेन हा एक मानसिक आजार आहे. प्रेमीयुगुलांमधील प्रेमाची उत्कटता आणि एकमेकांबद्दल असलेले मोठे आकर्षण तसेच कायम एकत्र राहण्याची भावना ही लव्ह ब्रेनची लक्षणे आहे. एखाद्याचे प्रेम इतके वरचढ ठरते की आपला प्रियकर अथवा प्रेयसी ही कायम आपल्या सोबत राहावी, त्याला सतत डोळ्यासमोर पाहण्याची इच्छा होणे, तो किंवा ती जवळ नसल्यास तर तो किंवा ती कुठे आहे आणि काय करतो आहे याबद्दल सर्व काही जाणून घेण्याची मानसिक स्थीती या प्रकारात होते. या प्रकारच्या वेडसर वर्तनाला लव्ह ब्रेन असे संबोधल्या जाते. सध्या शिओयूवर उपचार सुरू आहेत. तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर डॉ. डू ना यांनी सांगितले की, काहीवेळा या प्रकारचा आजार चिंता, नैराश्य आणि इतर परिस्थितीत देखील होऊ शकतो. ही स्थिती बालपणातील मानसिक तणावाशी संबंधित असू शकते, असेही डॉ. डू यांनी संगितले. हा आजार शिओयूला नेमका कसा झाला याचे कारण त्यांनी उघड केले नाही, परंतु असे म्हटले जाते की, ज्या तरुणांचे त्यांच्या पालकांशी चांगले संबंध नसतात, अशा व्यक्तिला हा आजार होऊ शकतो.
संबंधित बातम्या