मराठी बातम्या  /  निवडणुका  /  PM Modi in Pune : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात जाहीर सभा

PM Modi in Pune : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात जाहीर सभा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 24, 2024 09:02 AM IST

PM Modi In Pune: पुण्यात लोकसभा निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रचाराचा ज्वर आता आणखी वाढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत.

महायुतीच्या उमेदवांराच्या प्रचारासाठी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची रेसकोर्सवर होणार जाहीर सभा
महायुतीच्या उमेदवांराच्या प्रचारासाठी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची रेसकोर्सवर होणार जाहीर सभा

PM Modi In Pune: पुण्यात लोकसभा निवडणुकीची चुरस चांगलीच वाढली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार जोरदार प्रचार करत आहेत. या साठी बडे नेते मैदानात उतरले आहेत. महायुती कडून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मैदानात उतरले असून पुणे, शिरूर, मावळ आणि बारामतीमधील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात २९ एप्रिलला जाहीर सभा घेणार आहेत. ही सभा या पूर्वी एस.पी महाविघालयाच्या मैदानावर होणार होती. मात्र, ही जागा बदलण्यात आली असून आता ही सभा सोमवारी ७ वाजता रेसकोर्स मैदानावर होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mulshi crime : मुळशीत मुठा गावात थरार! कुख्यात गुंड व पोलीसांत चकमक; सिनेस्टाईल पाठलाग करून गुंड नवनाथ वाडकरला अटक

पुणे जिल्ह्यात लोकसभेचे चार मतदार संघ आहेत. या चारही मतदार संघात प्रचाराचा ज्वर वाढला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे तर पुणे, शिरूर आणि मावळ या मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. महायुती कडून या चारही जागांवर मतदार उभे करण्यात आले असून पुण्यातील माजी महापौर मुरलीधर मोहोळ, बारामतीतून सुनेत्रा पवार, शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील तर मावळमध्ये श्रीरंग बारणे हे निवडणूक रिंगणात उभे आहेत. महायुतीच्या या पंतप्रधान नरेंद मोदी यांची पुण्यात सभा होणार आहे. ही सभा २९ एप्रिलला होणार आहे. या पूर्वी ही सभा एसपी कॉलेजच्या मैदानावर होणार होती. मात्र, आता या सभेची जागा बदलण्यात आली आहे. या सभेसाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने सभेची जागा बदलण्यात आली आहे. ही सभा आता रेसकोर्सवर होणार आहे. २९ तारखेला संध्याकाळी ७ वाजता ही सभा होणार असल्याची माहिती आहे.

Maharashtra Weather Update : कोकणात उष्णतेची लाट तर विदर्भ मराठवाड्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम! असे असेल आजचे हवामान

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

या सभेसाठी भाजप आणि महायुतीच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे. या ठिकाणी मोदी यांच्या सभेसाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.

चोख सुरक्षा व्यवस्था

मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभमीवर पुणे पोलीसांतर्फे चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या ठिकाणी होणारी गर्दी पाहता या पहिली जागा बदलून ही सभा रेस कोर्सवर घेतली जाणार आहे.

WhatsApp channel