Pune water issue: पुण्यात पाणीबाणी! पाणी चोरी रोखण्यासाठी मुठा कालव्या जवळच्या परिसरात जमावबंदी; तिघांना अटक-mobilization orders on both sides of the mutha canal three unauthorized water collectors were taken into custody ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune water issue: पुण्यात पाणीबाणी! पाणी चोरी रोखण्यासाठी मुठा कालव्या जवळच्या परिसरात जमावबंदी; तिघांना अटक

Pune water issue: पुण्यात पाणीबाणी! पाणी चोरी रोखण्यासाठी मुठा कालव्या जवळच्या परिसरात जमावबंदी; तिघांना अटक

Apr 24, 2024 01:56 PM IST

Pune water issue: पुण्यात सध्या पाणी टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. धरणांनी तळ गाठला असून पाणी नियोजन करणे कळीचा मुद्दा ठरला आहे. त्यात खडकवासला धरणाच्या कालव्यातून पाणी चोरी होत असल्याचे उघड झाले आहे.

पुण्यात पाणी बाणी! पाणी चोरी रोखण्यासाठी मुठा कालव्या जवळच्या परिसरात जमावबंदी; तिघांना अटक
पुण्यात पाणी बाणी! पाणी चोरी रोखण्यासाठी मुठा कालव्या जवळच्या परिसरात जमावबंदी; तिघांना अटक

Pune water issue: पुणे जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. धरणांत कमी पाणीसाठा राहिला असून या पाण्याचे नियोजन करणे गरजेचे झाले आहे. दरम्यान, पाणी चोरीचे नवे संकट देखील पुढे आले आहे.  ही पाणी चोरी रोखण्यासाठी खडकवासला धरणाच्या दोन्ही कालव्याच्या सुरवाती पासून ते इंदापूरपर्यंत कालव्याच्या दोन्ही बाजुला ५० मीटरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या बाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

उल्हासनगरमधील कोणार्क अर्बन बँकेवर आरबीआयचे निर्बंध; पैसेही काढता येणार नाहीत

खडकवासला धरण साखळीत चार धरणे असून या चारही धरणात गेल्या वर्षीपेक्षा सुमारे ३ टीएमसी पाणीसाठा यावर्षी कमी झाला आहे. त्यामुळे या पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने या पाण्याचे नियोजन केले आहे. त्यात सध्या पुणे शहराला पिण्याचे आणि ग्रामीण भागात शेती सिंचनासाठी काही आवर्तने देणीयचे नियोजन देखील करण्यात आले आहे. सध्या ग्रामीण भागासाठी नवीन मुठा कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. या कालव्यातून भरून पाणी वाहत असून या पाण्यावर काही जणांचा डोळा आहे. हे पाणी ग्रामीण भागात पोहचे पर्यंत यातून मोठ्या प्रमाणात बेकायदा उपसा केला जात असल्याचे पुढे आले आहे. यामुले ही पाणी चोरी रोखण्यासाठी जलसंपदा विभागाने खडकवाला प्रकल्पाच्या प्रभारी अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप, कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कालवा परिसरात जमावबंदी लागू करण्याची विनंती केली होती. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी ही मागणी मान्य केली असून दोन्ही कालव्याच्या बाजूने १४४ कलम लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

Nagpur News : धक्कादायक! नागपूरच्या एनआयटीच्या स्विमिंग पूलमध्ये बडून तरुण प्राध्यापकाचा मृत्यू

तिघांना केली अटक

खडकवासला उजव्या कालव्यातून अनधिकृतपणे पाणी उपसा करणाऱ्या तीन शेतकऱ्यांना शिर्सुफळ येथे अटक करण्यात आली आहे. हा अनधिकृत उपसा थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी खडकवासलाधरण ते इंदापूरपर्यंतच्या संपूर्ण कालवा परिसरात जमावबंदी प्रतिबंधक १४४ कलम लागू केले आहे. पाण्याचा योग्य वापर व्हावा, यासाठी हे आदेश दिवसे यांनी दिले आहेत.

४ एप्रिलपासून उन्हाळी सुरू

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतीसाठी ४ ४ एप्रिलपासून उन्हाळी हंगामासाठी आवर्तन सुरू करण्यात आले आहे. हे आवर्तन सुरू असताना इंदापूरपर्यंत कालव्यातून दोन्ही बाजूंनी अनधिकृत्त पाणी उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. मंगळवारी वरखंड, भिगवण तसेच शिर्सुफळ येथे पाणी चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

विभाग