Uddhav Thackeray in Parbhani : महाविकास आघाडीचे परभणी लोकसभेचे उमेदवार संजय जाधव ह्यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नुकतीच जाहीर सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शिवसेनेच्या प्रचार गीतातील 'जय भवानी' शब्दाला निवडणूक आयोगानं आक्षेप घेतला आहे. त्यावरून उद्धव ठाकरे संतापले. हा निवडणूक आयोग मोदी-शहांचा नोकर आहे. त्यांना वाटतं आम्ही दिल्लीत बसून सांगू तसं देश ऐकेल. पण तसं होणार नाही. हा महाराष्ट्र मोदी-शहांना कान धरून उठाबशा काढत जय भवानी, जय शिवाजी बोलायला लावेल, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं.