मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणाचा व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रा म्हणाले, थोडा ब्रेक घ्या अन् जाऊन पाहा, VIDEO व्हायरल

महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणाचा व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रा म्हणाले, थोडा ब्रेक घ्या अन् जाऊन पाहा, VIDEO व्हायरल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 27, 2024 10:06 PM IST

Anandmahindra : आनंद महिंद्रा यांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ डोंगरावरून उतरताना शूट करण्यात आला आहे.

आनंद महिंद्रा यांनी कळसूबाई शिखराचा व्हिडिओ केला व्हायरल
आनंद महिंद्रा यांनी कळसूबाई शिखराचा व्हिडिओ केला व्हायरल

पैसा कमवण्याच्या नादात मनुष्य अनेक सुखांना मुकतो. आपल्या करिअरमध्ये स्वत:ला व्यस्त ठेवणाऱ्यामानवाला अनेक अनुभव व सुखांपासून वंचित रहावे लागते. असे लोक आपल्या चहुबाजुला असलेल्या निसर्गाच्या सौंदर्यापासून दूर राहतो. त्याचा आनंद घेऊ शकत नाही. उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand mahindra) यांनी एक्स वरएक व्हिडिओ शेअर करत सांगितले की, असे आयुष्य जगण्यासाठी लोकांना आपल्या कामातून थोडा ब्रेक घेणे आवश्यक आहे. आता हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आनंद महिंद्रा यांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ डोंगरावरून उतरताना शूट करण्यात आला आहे. डोंगराला स्पर्श करून जाणारे ढग आणि चमकणारा सूर्य पाहून हे दृष्य दुसऱ्या जगातील असल्याचे दिसते.

 

यामुळे समजते की, निसर्गाचे सौंदर्य किती अलौकिक आहे. आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर अनेक लोकांनी कमेंट केल्या आहेत.

व्हिडिओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, हे महाराष्ट्रातील कळसुबाई शिखर आहे. हे ठिकाण इगतपुरीमध्ये आमच्या इंजिन कारखान्याजवळ आहे. इगतपुरीला अनेक वेळा गेलो मात्र डोंगरावरील या शिखराविषयी कधी ऐकले नाही. त्यांनी सल्ला दिला की, असा अद्भुत नजराना पाहण्यासाठी दैनंदिन धावपळीच्या जीवनातून थोडा ब्रेक घेऊन या ठिकाणी जावे.

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ नेटिझन्सला खूप आवडला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ४ लाखाहून अधिक ह्व्यूज मिळाले आहेत. हे दृश्य पाहून अनेक लोक मंत्रमुग्ध झाले आहेत. एकाने कमेंट केली आहे की, निसर्गाच्या सुंदरतेची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. काही लोकांनी नाराजी व्यक्त करताना म्हटले की, आपल्या व्यस्त आयुष्यामुळे असे सुंदर क्षण अनुभवता येत नाहीत. काही जण म्हणाले की, ते इतके भाग्यवान नाहीत की, अशा ठिकाणी जाऊ शकतील.

IPL_Entry_Point