मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Ujjwal Nikam : भाजपकडून उज्ज्वल निकम यांची उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर, पुनम महाजनांचा पत्ता कट

Ujjwal Nikam : भाजपकडून उज्ज्वल निकम यांची उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर, पुनम महाजनांचा पत्ता कट

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 27, 2024 06:09 PM IST

Ujjwal Nikam North Central Mumbai : भाजपने उत्तर मध्य मंबई मतदारसंघात प्रसिद्ध चेहरा व ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्जवल निकम यांना तिकीट दिल्याने येथे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध उज्वल असा सामना लढणार आहे. दुसरीकडे भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापण्यात आले आहे.

उत्तर मध्य मुंबईतून भाजपकडून उज्जवल निकम यांना उमेदवारी दिली आहे.
उत्तर मध्य मुंबईतून भाजपकडून उज्जवल निकम यांना उमेदवारी दिली आहे.

मुंबई उत्तर मध्य (North Central Mumbai) लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा तिढा अखेर सुटला आहे. भाजपने या मतदारसंघात ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना मैदानात उतरवले आहे. भाजपने येथे प्रसिद्ध चेहरा उतरवल्याने येथे तुळ्यबळ लढत होणार आहे. या मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध उज्वल असा सामना लढणार आहे. दुसरीकडे भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपने आपल्या वाट्याला आलेल्या सर्व जागांवर उमेदवार जाहीर केले होते. मात्र मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात उमेदवार दिला नव्हता. विद्यमान खासदार पूनम महाजन यांना तिकीट जाहीर केलं नसल्यानं त्यांचं तिकीट कापलं जाणार हे जवळपास निश्चित होतं. मात्र पूमन महाजन यांनी मतदारसंघात प्रचार सुरू केला होता. तसेच आपणाला तिसऱ्यांदा निवडून देण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं होतं. मात्र या जागेवर भाजप कोणाला उतरवणार याची उत्सुकता होती. अखेर भाजपने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबईमधून उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यानंतर आता भाजपकडून उत्तर मध्य मुंबईतून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे वर्षा गायकवाड विरुद्ध निकम निकम (ujjwal nikam vs varsha gaikwad) अशी लढत होणार आहे.

भाजपकडून उत्तर मध्य मुंबई मतदारसंघासाठी अनेक नावांची चाचपणी करण्यात आली होती. अखेरीस काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपने आपले पत्ते खोलले आहेत. भाजपकडून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.

भाजपने उज्जवल निकम यांच्या नावाच्या घोषणा करण्यापूर्वी आशिष शेलार यांच्यापासून ते अभिनेत्री माधुरी दिक्षीत, अनुराधा पौडवाल अशा अनेक सेलिब्रिटीजची नावांची चाचपणी केलं होती.

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात पूनम महाजन यांना होत असलेला विरोध पाहता भाजपनं नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. उज्ज्वल निकम हे सरकारी वकील आहेत. अनेक खटल्यांमध्ये त्यांनी सरकारकडून महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. दहशतवादी कसाबविरुद्ध खटल्यात त्यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिलं आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. खैरलांजी दलित हत्याकांड, मुंबई दहशतवादी हल्ला, झवेरी बाजार बॉम्बस्फोट तसेच अन्य मोठ्या खटल्यात त्यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे.

WhatsApp channel