Pakistan Viral News : पाकिस्तानमध्ये नुकतीच एक धक्कादायक घटना घडली आहे. माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने आपल्या मित्राची निर्घृण हत्या केली आहे. मित्राने मैत्रिणीसाठी आणलेला अर्धा बर्गर खाल्ल्याने आरोपीचे त्याच्या मित्राशी भांडण झाले. यानंतर संतापलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने त्यांच्यावर गोळ्या झाडत त्याची हत्या केली. ही घटना फेब्रुवारी महिन्यात कराची शहरात घडली होती. दरम्यान जखमी मुलावर दवाखान्यात उपचार सुरू होते. या मुलाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी पोलिस प्रमुख नजीर अहमद मीरबहार यांचा मुलगा डॅनियल नजीर (वय १७) याने ८ फेब्रुवारी रोजी त्याची प्रेयसी शाझियाला त्याच्या घरी पार्टीसाठी बोलावले होते. यावेळी डॅनियलचा मित्र अली किरियो आणि त्याचा धाकटा भाऊ अहमर तिथे आधीच उपस्थित होते. अली आणि अहमरचे वडील स्थानिक सत्र न्यायाधीश आहेत.
दरम्यान, डॅनियलने स्वतःसाठी आणि प्रेयसीसाठी बर्गरची ऑर्डर दिली. दरम्यान, अली किरिओने डॅनियलच्या मैत्रिणीसाठी आणलेल्या बर्गरचा काही भाग खाल्ला. यानंतर डॅनियलचे अलीसोबत भांडण झाले. वाद वाढत गेल्याने डॅनियलचा संयम सुटला आणि त्याने सुरक्षा रक्षकाच्या रायफलने अलीवर ४ गोळ्या झाडल्या. यात तो गंभीर जखमी झाला. अलीला तातडीने रुग्णालयात नेले. दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डॅनियलच्या गोळीला मार लागल्याने अलीचा मृत्यू झाल्याचे या घटनेच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला डॅनियल अटक केली आहे. लवकरच त्याच्याविरुद्ध न्यायालयात खटला सुरू होणार आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
ही घटना सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. या प्रकरणी अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. काहीनी पाकिस्तानमध्ये वाढलेल्या गुन्हेगारी बद्दल चिंता व्यक्त केली आहे. तर काहींनी पाकिस्तान आर्थिक अडचणीत असल्याने या घटना वाढल्या असल्याचे म्हटले आहे. काहींनी क्षुल्लक कारणावरून केलेल्या हत्येमुळे आश्चर्य व्यक्त केले आहे.
संबंधित बातम्या