Chhatrapati Sambhaji Nagar Gangapur Crime : पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी घटना संभाजीनगर येथे घडली आहे. एका महिलेला मुलबाळ होत नसल्याने तिचा छळ करण्यात आला. तिला मारहाण करण्यात आली. ऐवढेच नाही तर तुझ्यात तृतीय पंथियाचा आत्मा आहे, असे सांगत तो काढण्यासाठी या महिलेच्या अंगात खिळे खुपसण्यात येऊन तिचा अमानुष छळ केला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ही घटना गंगापूर तालुक्यातील जामगाव येथे घडला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला ही ३५ वर्षांची आहे. ती गंगापुर येथील जामगाव येथील रहिवाशी आहे. दरम्यान, लग्नाला काही वर्ष होऊनही तिला मुलबाळ होत नसल्याने तिच्या सासरची मंडळी तिचा छळ करत होते. ऐवढेच नाही तर तिला अपमानास्पद वागणूक देखील दिली जात होती. तिला मूलबाळ व्हावे या साठी त्यांनी अनेक उपाय देखील केले, दरम्यान, या त्रासाला ही महिला कंटाळली होती. यामुळे एका नतेवाइकाने या महिलेला तिच्या अंगाग तृतीयपंथीयचा आत्मा असल्याचे सांगितले. तो बाहेर काढण्यासाठी जादूटोणा करावा लागेल असा सल्ला देखील दिला. दरम्यान नतेवाईकाचा सल्ला या महिलेने ऐकला आणि जादूटोणा करण्यास ही महिला तयार झाली.
या महिलेला विश्वासात घेऊन तिच्यावर जादूटोण्याचे प्रकार सुरू झाले. तब्बल दोन वर्ष हा अघोरी प्रकार सुरू होता. जादूटोण्याचे विधी करण्यासाठी महिलेला तिच्या घरच्यांनी जामगावला नेले. या गावी आल्यावर पीडित महिलेच्या अंगात असलेला आत्मा बाहेर काढण्यासाठी तिला बेदम मारहाण करण्यात आली. तिला काठीने बदडण्यात आले. मारहाण करून आत्मा निघत नसल्याचे कारण देत महिलेच्या अंगावर खिळे ठोकण्यात आले. दोन वर्ष हा त्रास या महिलेने सहन केला. डिसेंबर २०२२ ते एप्रिल २०२४ पर्यंत हा त्रास पीडितेने सहन केला. अखेर हा त्रास सहन न झाल्याने तिने थेट पोलिसात धाव घेत या बद्दल तक्रार दाखल केली. महिलेसोबत घडलेल्या या प्रकारामुळे पोलिस देखील हादरले. त्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींविरोधात अघोरी व अनिष्ट प्रथा, नरबळी, अमानुष अत्याचार, जादुटोण प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या