मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Loksabha Election : ईव्हीएममधील बिघाडाचा खासदाराला फटका! वर्ध्यात भाजप उमेदवार ४० मिनिटे ताटकळले; मतदारांची गैरसोय

Loksabha Election : ईव्हीएममधील बिघाडाचा खासदाराला फटका! वर्ध्यात भाजप उमेदवार ४० मिनिटे ताटकळले; मतदारांची गैरसोय

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 26, 2024 09:28 AM IST

Loksabha Election 2024 : राज्यात लोकसभा मतदानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे. विदर्भ मराठवड्यातील ८ जिल्ह्यात मतदान होत आहे. सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र, काही ठिकाणी मतदान यंत्रे बिघडाचे वृत्त आहे.

ईव्हीएममधील बिघाडाचा खासदाराला फटका! वर्ध्यात भाजप उमेदवार ४० मिनिटे ताटकळले; मतदारांची गैरसोय
ईव्हीएममधील बिघाडाचा खासदाराला फटका! वर्ध्यात भाजप उमेदवार ४० मिनिटे ताटकळले; मतदारांची गैरसोय

Loksabha Election 2024 : राज्यात लोकसभा मतदानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे. विदर्भ मराठवड्यातील ८ जिल्ह्यात मतदान होत आहे. सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र, काही ठिकाणी मतदान यंत्रे बिघडाचे वृत्त आहे. ईव्हीएम बिघडाचा फटका भाजपच्या एका खासदाराला बसला आहे. वर्ध्यात देवळी येथे यशवंत कन्या विद्यालयात मतदानाला सुरुवात होण्याआधीच ईव्हीएममध्ये बिघाड झाला. यामुळे ४० मिनिटे मतदान खोळंबले. यामुळे भाजप उमेदवार रामदास तडस हे ४० मिनिटे ताटकळले. त्यांच्या सोबत इतर मतदार देखील खोळंबले.

ट्रेंडिंग न्यूज

Loksabha Elections 2024 : नवनीत राणा, प्रकाश आंबेडकर यांच्यासह दिग्गजांचं भविष्य आज होणार मतपेटीत बंद

वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे यशवंत कन्या विद्यालयात इव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदान अद्याप सुरू झालेले नाही. ४० मिनिटे हे यंत्र सुरू झाले नाही. त्यामुळे सकाळ पासून मतदार या मतदांन केंद्रांवर रांगा लावून उभे होते. अर्धा तास होऊन देखील येथे मतदान सुरू होऊ शकले नव्हते. याचा फटका भाजप उमेदवार रामदास तडस यांना बसला. खासदार रामदास तडस हे परिवारासह देवळी येथील यशवंत कन्या माध्यमिक शाळेच्या १८५ क्रमांकाच्या केंद्रावर सकाळी ७ वाजता मतदान करायला आले होते.

Maharashtra weather update: राज्यातील मतदानावर अवकाळीचं सावट! बुलढाणा, अमरावतीसह 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता

मात्र, मतदान सुरू होण्याआधीच ईव्हीएम मशीन बंद पडले. तब्बल ४० मिनिटे हे यंत्र सुरू होऊ शकले नाही. सकाळी सव्वापाच वाजता या केंद्रावरील मशीन नादुरुस्त असल्याची तक्रार करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी हे मशीन दुरुस्त देखील केले. मात्र, मतदान सुरू करतांना हे मशीन पुन्हा बंद पडले. यावेळी तडस हे त्यांच्या परिवारासोबत बाहेर ताटकळले. तडस यांच्या सोबट मतदारांची रांग लागली होती. अखेर ४० मिनिटानंतर हे यंत्र सुरळीत सुरू झाले. यानंतर तडस यांनी मतदानाचा हक्क बजावला.

अमरावती येथेही ईव्हीएममध्ये बिघाड

अमरावती येथे देखील एका केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची माहिती आहे. या ठिकाणी अर्धा तास मशीन सुरू होऊ न शकल्याने मतदार ताटकळले. अधिकाऱ्यांनी तातडीने यंत्र दुरुस्त करण्यासाठी तज्ञांना पाचारण केले आणि बिघाड दुरुस्त करण्यास सुरुवात केली.

WhatsApp channel