JEE Main Result 2024 : जेईई मुख्य परीक्षेचा दुसऱ्या सत्राचा निकाल एनटीएने बुधवारी रात्री उशिरा जाहीर केला. यात दोन मुलींसह ५६ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. जेईई (मुख्य) परीक्षेत विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील बेलखेड गावातील एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने सर्वाधिक गुण मिळवून या परीक्षेत यश संपादन केले आहे. निलकृष्ण गाजरे असे या मुलाचे नाव असून त्याने या परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला आहे. त्याच्या यशाचे कौतुक होत आहे. गजरे याच्यासह मुंबईतील दक्षेश मिश्रा याने देखील जेईई मुख्य परीक्षेत यश मिळवले आहे.
जेईई मुख्य परीक्षेचा दुसऱ्या सत्राचा निकाल एनटीएने बुधवारी रात्री उशिरा जाहीर केला. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जानेवारी आणि एप्रिल सत्रासाठी पेपर १ बीई आणि बीटेकचा एकत्रित निकाल जाहीर केला. या निकालात ५६ उमेदवारांनी १०० टक्के गुण मिळवले आहे. यात दोन मुलींचा देखील समावेश आहे. महाराष्ट्रातील सात विद्यार्थ्यांनी या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. तब्बल २ लाख ५० हजार २८४ मुलांनी आयआयटी प्रवेश परीक्षा जेईईसाठी पात्र ठरले आहेत.
निलकृष्ण गाजरे हा मूळचा विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील बेलखेड गावातील आहे. त्याचे वडील शेतकरी आहेत. प्रामुख्याने ते त्यांच्या शेतात सोयबीनचे उत्पादन घेतात. शेतीत चांगले उत्पन्न मिळेलच याची खात्री नसतांना देखील त्याचे वडील आज देखील शेती करत आहेत. आपला मुलगा मोठा व्हावा यासाठी त्यांनी त्यांच्या मुलाला अभियंत्रिकी शिक्षण देण्याचे ठरवले. निलकृष्णने देखील त्याच्या वडीलांच्या कष्टाचे चीज केले आहे. पहिल्याच प्रयत्नात त्याने जेईईच्या परीक्षेत यश मिळवले आहे. त्याने सर्वाधिक गुण मिळवून या परीक्षेत यश संपादन केले आहे. निलकृष्ण गाजरेला देशातील प्रमुख अभियांत्रिकी संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी बॉम्बेमध्ये प्रवेश करण्याची आशा आहे.
निलकृष्ण गजरे (वय १८) याने जेईई (मुख्य) च्या दोन्ही सत्रांची परीक्षा दिली. जानेवारीतील पहिल्या सत्रात त्याने चांगले गुण मिळवले होते. एनटीएने कटऑफ काढतांना दोन्ही परीक्षांपैकी सर्वोत्तम गुणांचा वापर केला. दोन्ही सत्रातील गुण एकत्र करून गुणवत्ता यादी तयार करण्यात आली. लहानपणापासूनच, गजरे हा लहानपणापासून अभ्यासात हुशार होता. त्याने शिष्यवृत्ती परीक्षेसोबत अनेक विज्ञान स्पर्धा देखील जिंकल्या आहेत.
नवी मुंबईचा मुलगा दक्षेश मिश्रा (वय १८ ) यानेही पहिल्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवले यार दुसऱ्या प्रयत्नात त्याने ही बाजी मारली.