मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 11 January 2023 Live: ‘भारत जोडो’च्या समारोप समारंभासाठी २१ राजकीय पक्षांना आमंत्रण

Rahul Gandhi Bharat Jodo yatra

Marathi News 11 January 2023 Live: ‘भारत जोडो’च्या समारोप समारंभासाठी २१ राजकीय पक्षांना आमंत्रण

05:50 PM ISTJan 11, 2023 11:20 PM Ninad Vijayrao Deshmukh
  • twitter
  • Share on Facebook

भारत जोडो यात्रेचा ३० जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये होणार समारोप. समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देशातील समान विचारधारा असलेल्या २१ राजकीय पक्षांना आमंत्रित केलं आहे.

Wed, 11 Jan 202305:17 AM IST

Share Market Updates : शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात, सेन्सेक्समध्ये वाढ

आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी, आज शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली आहे. कालच्या ६०११५ अंश पातळीवरुन सुरुवात करताना आज त्यात १९ अंशांची वाढ झाली आहे. सेन्सेक्स सकाळी ९.१५ मिनिटांनी अंदाजे ६०,१३४.५६ अंश पातळीवर ट्रेड करत आहे. याचप्रमाणे निफ्टीही अंदाजे १७ हजार ९२४ अंशपातळीवर खुला झाला असून त्यात १० अंशांची वाढ झाली आहे. काल बंद होतेवेळी निर्देशांकात तब्बल ६३० अंशांची घसरण झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात परदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा कायम ठेवल्याने निर्देशांकाच्या अंश पातळीत घसरण झाली होती.

Wed, 11 Jan 202302:45 AM IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांचे हृदय विकरांच्या झटक्याने निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांचे निधन झाले. छाजेड हे इंटकचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षही होते. मंगळवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. हृदयविकाराचा धक्का आल्याने त्यांना नाशिकमध्ये एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती आहे. ते ७५ वर्षांचे होते.

Wed, 11 Jan 202301:18 AM IST

वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नका, जाळू नका: महावितरण

 

पुणे: शहरी व ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी किंवा घरे, इमारतींच्या परिसरात असलेल्या वीजयंत्रणेजवळ सुका व ओला कचरा टाकल्यामुळे किंवा कचऱ्याने पेट घेतल्यामुळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होत आहे. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहे. नागरिकांनी वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नये किंवा जाळू नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Wed, 11 Jan 202301:18 AM IST

पतंगोत्सवात वीजयंत्रणेपासून सावध राहण्याचे आवाहन

पुणे: मकरसंक्रातीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना सार्वजनिक ठिकाणी असलेल्या उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आणि इतर वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगावी असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

Wed, 11 Jan 202312:25 AM IST

कुस्तीपटूंना मानधनासोबत निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करणार- पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील

पुणे: कुस्तीपटू आपले संपूर्ण आयुष्य कुस्ती खेळासाठी समर्पित करीत असल्याने त्यांना चांगले मानधन निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा मिळणे गरजेचे असून यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

Wed, 11 Jan 202312:25 AM IST

‘शैक्षणिक दिशादर्शिका’ शिक्षण क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरेल ; शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई  : नियोजन हा यशस्वीतेचा मूलमंत्र आहे. शासकीय कामकाजाचेही संभाव्य नियोजन केले तर त्याचा लाभ प्रशासकीय कामकाज विहीत कालावधीत करण्यासाठी होऊन दर्जेदार शिक्षणाचे आणि आदर्श विद्यार्थी घडविण्याचे आपले उद्दिष्ट साध्य करणे सुलभ होईल. यादृष्टीने ‘शैक्षणिक दिशादर्शिका’ शिक्षण क्षेत्राला दिशा दाखविणारी ठरेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

Wed, 11 Jan 202312:24 AM IST

मुंबईतील खड्यासंदर्भात हाय कोर्टात सुनावणी 

मुंबईसह आसपासच्या परिसरातील उघडी मॅनहोल आणि रस्त्यावरच्या  खड्डे यांसदर्भात हायकोर्टात दाखल जनहित याचिकेवर आज सुनावणी पार पडणार आहे.  

Wed, 11 Jan 202312:22 AM IST

Pakistan Economy : पाकिस्तानात महागाईनं गाठला उच्चांक; गव्हाच्या पीठासाठी भांडणं

Pakistan Economy : पाकिस्तानात महगाईचे संकट निर्माण झाले आहे. अर्थव्यवस्था ढासळली आहे. देशातील सर्वसामान्यांनागरिकांना दोन वेळेचे जेवेन घेणे कठीण झाले आहे. गव्हाच्या पिठासाठी लोक भांडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.