मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mahavikas Aaghadi Morcha : शिंदे-फडणवीस हे महाराष्ट्राचे लुटेरे आहेत- ठाकरे

Mahavikas Aaghadi Morcha : शिंदे-फडणवीस हे महाराष्ट्राचे लुटेरे आहेत- ठाकरे

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 17, 2022 05:25 PM IST

Maha Vikas Aghadi Morcha Today Live : सत्ताधारी भाजपसह शिंदे गटाच्या नेत्यांकडून महापुरुषांबाबत होत असलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मुंबईत महाविकास आघाडीचा निषेध मोर्चा होत आहे.

Maha Vikas Aghadi Morcha Today Live
Maha Vikas Aghadi Morcha Today Live (HT)

Maha Vikas Aghadi Morcha Today Live : सत्ताधारी भाजपसह शिंदे गटाच्या नेत्यांकडून महापुरुषांबाबत होत असलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचा मोर्चा निघाला आहे. या मोर्चात किमान २ लाख लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. या आंदोलनात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे तर कॉंग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

महामोर्चाचे क्षणोक्षणीचे लाइव्ह अपडेट्स:

 

 

 

  • महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वाचाळ नेत्यांवर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही- शरद पवार
  • बिहार, उत्तर प्रदेशात महात्मा फुले यांचं नाव आदरानं घेतलं जातं, परंतु महाराष्ट्रात सरकारमधील मंत्र्यांसह राज्यपालही वादग्रस्त वक्तव्य करतायंत, यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही- शरद पवार
  • छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कधीही सहन करणार नाही. महाराष्ट्राच्या सन्मानासाठी आम्ही एकवटलो आहोत- शरद पवार
  • मुंबईतील जागा बिल्डरच्या घशात घालतायतं. मुंबई, महाराष्ट्र ही आमची मातृभूमी आहे. भाजपचे लोक स्क्वेअर फूटावर मुंबईला मोजतात- उद्धव ठाकरे
  • खोके घेऊन, पाठित वार करून, आईच्या कुशीत वार करून त्यांची तुलना शिवाजी महारांजाबरोबर करताय?, परंतु आता या गर्दीनं महाराष्ट्रद्रोह्यांचे डोळे उघडायला हवेत- उद्धव ठाकरे
  • फुले दाम्पत्यानं त्यावेळी अंगावर शेण झेललं नसतं तर आपणही शाब्दिक भीक मागत वैचारिक दारिद्र सिद्ध केलं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय बोलण्याचा अधिकार या लफंग्यांना नाही. हे महाराष्ट्राचे लुटेरे आहेत- उद्धव ठाकरे
  • कोश्यारींना मी राज्यपाल मानत नाही. त्या पदावर बसून कुणीही टपल्या माराव्यात, हे आम्ही सहन करणार नाही. महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करताना लाज नाही वाटत?- उद्धव ठाकरे

Raj Thackeray : काय सोडावं आणि काय धरावं अशी मनसेची स्थिती; रुपाली ठोंबरे पाटील यांचा वर्मावर घाव

  • महापुरुषांच्या अपमानाविरोधात सर्व पक्ष एकवटलेत, परंतु महाराष्ट्रद्रोही शांत आहेत. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्या तोत्यांनी खुर्चीसाठी दिल्लीची लाचारी केली- उद्धव ठाकरे
  • माझ्याबरोबर लाखो महाराष्ट्रप्रेमी महाराष्ट्रद्रोह्यांच्या छाताडावर चालण्याची ही वेळ आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर पहिल्यांदाच मुंबईत असं दृष्य दिसलं- उद्धव ठाकरे
  • राज्यातील कर्मचाऱ्यांची खाती कर्नाटक बॅंकेत कशी काय वर्ग करण्यात आली?, कर्नाटक सरकार आपल्यावर अन्याय करतंय आणि हे शिंदे-फडणवीस सरकार तिकडे खाती उघडायला सांगताय?- अजित पवार
  • आम्ही अनेक सरकारमध्ये काम केलं. परंतु अचानक सीमेवरील गावं दुसऱ्या राज्यांत जाण्याची मागणी केल्याची घटना घडलेली नाही. त्यामुळं याचा राज्याच्या जनतेनं आणि सत्ताधाऱ्यांनी विचार करायला हवा- अजित पवार
  • कर्नाटकातील मराठी भाषिक प्रांत असलेल्या बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर आणि भालकी हे प्रांत महाराष्ट्रात आणण्यासाठीचा संघर्ष सुरू असतानाच राज्यातली गावं कर्नाटकात कशी काय जातायंत- अजित पवार

Jitendra Awhad: हे मुख्यमंत्री आहेत की व्हाइसरॉय?; शिंदे गटाच्या 'ठाणे बंद'वर जितेंद्र आव्हाड भडकले!

  • आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना हटवायला हवं, विधीमंडळाच्या अधिवेशनात त्याबद्दलचं बील सत्ताधाऱ्यांनी आणायला हवं- अजित पवार
  • महापुरुषांना भिकारी म्हणतायंत, मंत्र्यांना असं वक्तव्य करताना लाज वाटायला हवी, आजचा मोर्चा हा सत्ताधारी शिंदे-फडणवीसांना धडकी भरवणारा आहे- अजित पवार
  • महाराष्ट्राच्या मातीला फुटीचा अन् गद्दारीचा शाप असला तरी संकटकाळात आपण सर्वजण एकत्र येत असतो. महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य आता बंद व्हायला हवीत. शिवराय, शाहु, फुले, आंबेडकर आणि अन्य महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांचा मास्टरमाईंड कोण आहे?- अजित पवार
  • राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं सभास्थळी आगमन झालं आहे. यावेळी त्यांचं उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं आहे.
  • महाराष्ट्रद्रोही सरकारचा निषेध करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं. विरोधकांची वज्रमूढ एकत्र राहिली तर केंद्र सरकारला उलथवून लावू- नाना पटोले
  • मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंना जमत नसेल तर प्रश्न आमच्या ताब्यात द्या, रोज महाराष्ट्राच्या बदनामी करणारं वक्तव्य करतायंत. चीनशी लढण्याची भाषा करणारे मराठी भाषिकांवर अन्याय करतंय- संजय राऊत
  • आज महाराष्ट्र जागा झाला आहे, ठिणगी पेटलीये, हे आता दिल्लीश्वरांनाही कळालं असेल. शिवरायांचा अपमान करणारे मंत्रालयात बसलेत याचं वाईट वाटतंय- संजय राऊत
  • आजच्या मोर्चानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पदच्यूत केलेलं आहे. शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघू शकणार नाही- संजय
  • राऊत
  • पुढील काही क्षणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे महामोर्चाच्या सभास्थळी दाखल होणार आहेत. चव्हाण सेंटरवरून सभास्थळासाठी रवाना झाले आहेत.
  • मविआच्या महामोर्चात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि अनेक संघटनांच्या नेत्यांनी हजेरी लावली आहे.

उद्धव ठाकरे, अजित पवारांच्या उपस्थितीत महामोर्चाला सुरुवात; भाजपविरोधात मविआ मुंबईत एकवटली

  • मविआच्या महामोर्चात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर समर्थकांकडून मोहम्मद अली रोडवर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. यावेळी शिवसैनिकांनी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं.
  • माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे महामोर्चाच्या सभेस्थळी दाखल झाल्या आहेत. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली.
  • मविआचे सर्व प्रमुख नेते टाइम्स ऑफ इंडियाच्या बिल्डिंगजवळ पोहचले आहेत. थोड्याच वेळात मविआच्या जाहीर सभेला सुरुवात होणार आहे.
  • महाविकास आघाडीचा महामोर्चा टाइम्स ऑफ इंडियाच्या बिल्डिंगजवळ पोहचला आहे. यावेळी मविआच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे.

  • विरोधी पक्षनेते अजित पवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी गृहमंत्री महामोर्चात सहभागी झाले आहेत.
  • माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे महामोर्चात सहभागी झाले आहेत.
  • महाविकास आघाडीच्या महामोर्चाला सुरुवात झाली असून यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत मोर्चाला सुरुवात झाली आहे.

राज्यपाल आणि मंत्र्यांनी चुका केल्या अन् आम्ही माफी का मागायची?, भुजबळांचा सत्ताधाऱ्यांना थेट सवाल

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे देखील थोड्यात वेळात आंदोलनस्थळी दाखल होणार आहेत.
  • माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे महाविकास आघाडीच्या महामोर्चात सहभागी होण्यासाठी मातोश्री निवासस्थानावरून भायखळ्यासाठी रवाना झाले आहेत.
  • थोड्याच वेळात महाविकास आघाडीसह अन्य पक्षीयांच्या मोर्चाला होणार सुरुवात. मोर्चात सहभागी होण्यासाठी विविध पक्षांचे नेते निघाले
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मोर्चात सहभागी होण्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसच्या वतीनं नाना पटोले, भाई जगताप भायखळा इथं पोहोचले.
  • महाविकास आघाडीच्या महामोर्चात सहभागी होण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निघाले. माजी मंत्री आदित्य ठाकरे हे देखील मोर्चात सहभागी होण्यासाठी भायखळ्याच्या दिशेनं रवाना.

Jitendra Awhad: हे मुख्यमंत्री आहेत की व्हाइसरॉय?; शिंदे गटाच्या 'ठाणे बंद'वर जितेंद्र आव्हाड भडकले!

  • महाविकास आघाडीच्या मुंबईतील महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची पळापळ. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला.
  • मविआच्या सभेला शरद पवार संबोधित करणार, साडेबारा वाजता होणार जाहीर सभा
  • थोड्या वेळात मोठ्या पोलीस बंदोबस्तात महाविकास आघाडीच्या महामोर्चाला होणार सुरुवात
  • रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (अ)चे नेते दीपक निकाळजे यांचा महाविकास आघाडीच्या मोर्चाला पाठिंबा

शिवरायांचा अपमान झाला तेव्हा बंद का पुकारला नाही?; पत्रकारांच्या प्रश्नावर ठाणे बंद करणारे निरुत्तर

  • भायखळा आणि नागपाडा परिसरात सुषमा अंधारेंविरोधात मराठा युवा सेनेकडून बॅनरबाजी
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या २०० गाड्यांचा ताफा मुंबईकडे निघाला
  • झेंडे फडकावत आणि घोषणाबाजी करत नाशिकहून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं रवाना
  • राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मोर्चात होणार सहभागी
  • मोर्चाला दोन लाख लोक येणार, महाविकास आघाडीचा दावा. मुंबईत पोलीस सज्ज. हजारो पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. ड्रोनच्या मदतीनंही मोर्चावर नजर ठेवणार
  • महाविकास आघाडीच्या मोर्चाला सकाळी नऊ वाजता महामोर्चाला होणार सुरुवात

IPL_Entry_Point