मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  उद्धव ठाकरे, अजित पवारांच्या उपस्थितीत महामोर्चाला सुरुवात; भाजपविरोधात मविआ मुंबईत एकवटली

उद्धव ठाकरे, अजित पवारांच्या उपस्थितीत महामोर्चाला सुरुवात; भाजपविरोधात मविआ मुंबईत एकवटली

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 17, 2022 01:04 PM IST

Maha Vikas Aaghadi Maha Morcha : महापुरुषांच्या अपमानाविरोधात लाखो समर्थकांसह मविआचे अनेक नेते मुंबईत एकवटले आहेत. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत महामोर्चाला सुरुवात झाली आहे.

Maha Morcha MVA
Maha Morcha MVA (HT)

Maha Vikas Aaghadi Maha Morcha Mumbai Live Updates : महापुरुषांच्या अपमानाविरोधात महाविकास आघाडीच्या महामोर्चाला मुंबईत सुरुवात झाली असून या आंदोलनात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे अनेक बडे नेते सहभागी झाले आहेत. लाखोंच्या संख्येनं लोकांनी या महामोर्चात गर्दी केली असून शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. याशिवाय मविआच्या नेत्यांनीही महापुरुषांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत भायखळ्यातून महामोर्चाला सुरुवात झाली होती. त्यानंतर या आंदोलनात शिवसेनेकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत, माजी मंत्री आदित्य ठाकरे, अनिल परब तर राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री छगन भुजबळ आणि जितेंद्र आव्हाड हे सहभागी झाले आहेत. कॉंग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, आमदार भाई जगताप यांच्यासह अन्य नेत्यांनी महामोर्चात सहभाग नोंदवला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या ऑफिसजवळ होणार जाहीर सभा...

महाविकास आघाडीच्या आंदोलनाला भायखळ्यातून सुरुवात झाली असून थोड्याच वेळात सर्व नेते टाईम्स ऑफ इंडियाच्या ऑफिसजवळ पोहचणार आहेत. त्यानंतर मविआतील प्रमुख नेते उपस्थितांना संबोधित करणार आहेत. याशिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील थोड्याच वेळात आंदोलनस्थळी दाखल होणार असून जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.

 

आपापल्या पक्षाचा झेंडा हाती घेत नेत्यांचं आंदोलन...

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आमदार भाई जगताप यांनी कॉंग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला असून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेत शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध केला आहे. महाविकास आघाडीचे राज्यातील सर्व नेते आजच्या आंदोलनात सहभागी झाले असून यावेळी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

IPL_Entry_Point