shivsena ubt teaser : राज्यात लोकसभा निवडणुकांचा धुरळा उडाला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने आपले उमेदवार घोषित करून निवडणूक रिंगणात उतरवले आहे. या उमेदवारांचा जंगी प्रचार देखील सुरू झाला आहे. या प्रचारासाठी आपले निवडणूक चिन्ह सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचावे यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने पक्षाचे टीजर लॉंच केले आहे. यात त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर टीका केली असून ठाकरेंच्या या टीजरची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
राज्यात गेल्या दोन वर्षात अनेक राजकीय उलथा पालथी झाल्या. शिवसेनेतून फुटून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला तर राष्ट्रवादी फुटून अजित पावर यांनी वेगळा गट स्थापन केला. मूळ पक्षाचे अध्यक्ष असणाऱ्यांना पक्ष चिन्ह न देता निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या कडे शिवसेना आणि पक्ष चिन्ह दिले.
तर अजित पवार यांना राष्ट्रवादी आणि घडयाळ हे पक्ष चिन्ह देण्यात आले. तर ठाकरे गटाला शिवसेना उद्धव ठाकरे हे नाव देऊन त्यांना पक्षचिन्ह मशाल देण्यात आले. तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉँग्रेस नाव देऊन तुतारी वाजवणारा माणूस हे पक्ष चिन्ह शरद पवार यांना देण्यात आले. उद्धव ठाकरे आणि पवार हे सध्या या नव्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवणार आहे.
उद्धव ठाकरे गटाने त्यांचे लोकसभा निवडणुकीसाठीचे उमेदवार जाहीर केले आहे. तर पक्षचिन्ह मशाल सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी त्यांनी आता नवे टीजर लॉंच केले आहे. यात सरकारवर टीका करण्यात आली आहे.
देशातील हुकूमशाही राख करायला, देशद्रोह्यांना हाकलून द्यायला, समस्यांच भस्म करायला, जणसामान्यांच्या मदतीला, आणि दिल्लीला दिशा दाखवायला ठाकरे यांची मशाल येत आहे असे असे या टीजरची थीम आहे. त्यामुळे या निवडणुकीत ठाकरे याची मशाल किती तळपणार हे मतदार राजा दाखवून देणार आहे.
संबंधित बातम्या