Rohit Pawar : खेकडा प्रकरणावरून रोहित पवार अडचणीत, खेकड्याचा छळ केल्याने पेटाची कारवाईची मागणी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rohit Pawar : खेकडा प्रकरणावरून रोहित पवार अडचणीत, खेकड्याचा छळ केल्याने पेटाची कारवाईची मागणी

Rohit Pawar : खेकडा प्रकरणावरून रोहित पवार अडचणीत, खेकड्याचा छळ केल्याने पेटाची कारवाईची मागणी

Apr 06, 2024 10:16 AM IST

PETA Files Complaint Against MLA Rohit Pawar : शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना पत्रकार परिषदेत खेकडा (crab) आणणे महागात पडले आहे. या प्रकरणी पेटाने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

खेकडा प्रकरणावरून रोहित पवार अडचणीत, खेकड्याचा छळ केल्याने पेटाची कारवाईची मागणी
खेकडा प्रकरणावरून रोहित पवार अडचणीत, खेकड्याचा छळ केल्याने पेटाची कारवाईची मागणी

PETA Files Complaint Against MLA Rohit Pawar : शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)यांना पुण्यातील पत्रकार परिषदेत खेकडा आणणे महागात पडले आहे. हे खेकडा प्रकरण त्यांना भोवणार आहे. या प्रकरणी पेटाने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली असून या संदर्भात ‘पेटा’ने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांना पाठविले आहे.

MHT-CET PCM Exam: तारखांच्या गोंधळामुळे ५ मे रोजी होणारी अभियांत्रिकी आणि फार्मसी प्रवेश परीक्षा रद्द

आमदार रोहित पवार यांनी पुण्यात काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी जीवंत खेकडा आणला होता. हा खेकडा त्यांनी उलटा लटकवून विरोधकांवर आरोप केला होता. दरम्यान, हेच प्रकरण आता रोहित पवार यांच्या अंगलट आले आहे. खेकड्याला दोरीने लटकवल्याने त्याचा छळ झाल्याचा आरोप ‘पेटा इंडिया’ संस्थेने केला असून या प्रकरणी आमदार रोहित पवार यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी ‘पेटा’ने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांना पत्र पाठवले आहे. या सोबतच पशुवैद्यकीय सेवा आणि पुन्हा निसर्गात पुनर्वसन करण्यासाठी खेकड्याला त्यांच्याकडे देण्याची मागणी देखील ‘पेटा’ने केली आहे.

Gudi Padwa : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी उभी राहणार कल्याणची गुढी! पर्यावरण रक्षणाचा देणार संदेश

या संदर्भात ‘पेटा इंडिया’चे कायदेविषयक सल्लागार विभागाचे शौर्य अग्रवाल यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, खेकड्याचा केलेला वापर हा पूर्वनियोजित असून हे व्हिडिओवरून स्पष्ट झाले आहे. प्रसिद्धीसाठी त्यांनी खेकड्याला दुखवले आहे. हे गैरप्रकार थांबविण्यासाठी आम्ही रोहित पावर यांच्या विरोधात तक्रार करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रचारात प्राण्यांचा वापर करण्यास मनाई

निवडणूक प्रचार करतांना महाराष्ट्र आदर्श आचारसंहितेनुसार प्राण्यांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे तसे आदेश मुख्य निवडणूक कार्यालयाने २४ मार्च २०२४ रोजी काढला आहे. निवडणूक आयोगाने आदर्श आचासंहितेबाबत केलेली नियमावली तसेच  १९ सप्टेंबर २०१२ रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेले परीपत्र या नुसार आमदार रोहित पवार यांनी  प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० चे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाईची  मागणी ‘पेटा इंडिया’ने केली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर