मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : राज्यावर दुहेरी संकट! उष्णतेच्या लाटेबरोबर अवकाळी पावसाची शक्यता; गुडीपाडव्याला हलक्या सरी

Maharashtra Weather Update : राज्यावर दुहेरी संकट! उष्णतेच्या लाटेबरोबर अवकाळी पावसाची शक्यता; गुडीपाडव्याला हलक्या सरी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 06, 2024 06:07 AM IST

Maharashtra Weather Update : राज्यात उष्णतेत मोठी वाढ होत आहे. हवामान विभागाने राज्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट (heat wave) आणि अवकाळी पावसासाचा इशारा (unseasonal rain in Maharashtra) दिला आहे.

ज्यावर दुहेरी संकट! उष्णतेच्या लाटेबरोबर अवकाळी पावसाची शक्यता; गुडीपाडव्याला हलक्या सरी
ज्यावर दुहेरी संकट! उष्णतेच्या लाटेबरोबर अवकाळी पावसाची शक्यता; गुडीपाडव्याला हलक्या सरी

Maharashtra Weather Update : राज्यात उष्णतेत कमालीची वाढ झाली आहे. उन्हामुळे नागरिकांच्या जिवाची लाही लाही होत आहे. अशातच हवामान विभागाने उष्णतेची लाट (heat wave) आणि अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे दुहेरी संकटाचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येणार आहे. या सोबतच वादळी वारा, वीजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा (unseasonal rain in Maharashtra) इशारा देण्यात आला आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रेंडिंग न्यूज

MNS Padwa Melava: मनसे पाडवा मेळाव्याच्या पार्श्वूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी

गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक जिल्ह्यात हलक्या सरी बरसण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, शुक्रवारी सोलापूर जिल्हा देशभरात सर्वाधिक तापमान असणाऱ्या शहरांच्या यादीत जाऊन पोहचला. या ठिकाणी ४३.१ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

हवामान विभागाच्या पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, वातावरणातील खालच्या थरातील वाऱ्यांची द्रोणीका रेषा विदर्भ ते कामोरीयन भागापर्यंत गेली आहे. संपूर्ण राज्यात आज हवामान कोरडे राहणार आहे. तर उद्यापासून पुढील पाच ते सहा दिवस कोकण गोवा वगळता उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच रात्री उकाडा मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात ७ व ८ तारखेला काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी मेघ गर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहून काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात ७ व ८ तारखेला वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, अमरावती येथे मेघगर्जनेसह पाऊस व गारा पडण्याची शक्यता आहे.

SRH vs CSK Highlights : चेन्नई सुपर किंग्सचा सलग दुसरा पराभव, पॅट कमिन्सनं धोनीलाही चारली धुळ

पुण्यात हलक्या पावसाचा इशारा

पुणे व परिसरात ८ एप्रिल पर्यंत आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. ९ व १० तारखेला आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. तसेच हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे

विदर्भासह राज्यात आग्नेय दिशेने बंगालच्या उपसागरावरून सध्या मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे येत असून रविवारपासून अरबी समुद्रावरूदेखील बाष्पयुक्त वारे राज्यात येण्याचा अंदाज हवमान विभागाने दिला आहे. या वाऱ्यामुळे विदर्भात दोन दिवस म्हणजेच रविवारी व सोमवारी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मंगळवारी, गुढीपाडव्याच्या दिवशी कोकण गोवा आणि किनारपट्टीचा भाग वगळता राज्याच्या बहुतांश ठिकाणी विजांचा कडकडाट मेघगर्जना, व सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

IPL_Entry_Point