Solapur temperature highest in country : राज्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सूर्य आग ओकत आहे. तापमानात (temperature) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक शहरातील तापमानाने ४० ओलांडली आहे. नागरिक उन्हामुळे त्रस्त असतांना देशभरात सर्वाधिक तापमान असणाऱ्या शहरांच्या यादीत राज्यातील सोलापूर जिल्ह्याच्या समावेश झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात शुक्रवारी ४३.१ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर आंध्र प्रदेशातील रायलसीमा भाग देशात सर्वाधिक गरम ठिकाण ठरला आहे, येथील नंद्याल शहरात ४३.७ डिग्री सेल्सिअस तापनाची नोंद झाली. दरम्यान हवामान विभागाने राज्यात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात मोठ्या प्रमाणात ऊन वाढले आहे. उन्हामुळे जिवाची लाही लाही होत आहे. अशातच आता राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात बऱ्याच जिल्ह्यांचे तापमान हे ४० डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.
एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सूर्य आग ओकत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होत असल्याचे हवामान विभागाने नोंदवले आहे. सोलापूरमध्ये राज्यातील सर्वाधिक ४३.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हवामान विभागाने आज विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर मराठवाडय़ात पुढील तीन दिवस रात्री नागरिकांना उकाडा सहन करावा लागणार असल्याचे म्हटले आहे. बहुतांश जिल्ह्यातील पारा हा पुढील दोन दिवस ४० अंशांवरच राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
राज्यात शुक्रवारी मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरी ४० डिग्री सेल्सिअसवर होते. विदर्भात तापमान ४२ अंशांवर होते. मराठवाडय़ात देखील सरासरी तापमान ४० अंश डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आले. राज्यात पुढील काही दिवस कोरडे हवामान राहणार आहे. कोकण आणि गोवा तसेच किनारपट्टीच्या भागात कमाल तापमान ३२ अंश नोंदवण्यात आले. गुरुवार पेक्षा शुक्रवारी तापमान वाढल्याचे आढळून आले. शुक्रवारी अलिबागमध्ये ३.४, डहाणूत १.६, कुलाब्यात १.५ अंश सेल्सिअसने वाढ झाल्याचे नोंदवण्यात आले.
विदर्भात शुक्रवारी गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी तापमानात सरासरी ०.५ अंश सेल्सिअसने तापमानात घट झाल्याचे आढळले. तर आज शनिवारी मात्र तापमान वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रविवारी व सोमवारी विदर्भात गारपीट होण्याचा, आणि मंगळवारी गुढीपाडव्याच्या दिवशी राज्याच्या बहुतेक भागात विजांचा कडकडाट, मेघगर्जना, आणि वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पाऊस झाल्यास नागरिकांना उकाड्या पासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या