आयपीएल २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्सने (CSK) दोन सामने खेळले. पण यातील एकाही सामन्यात महेंद्रसिंह धोनी फलंदाजीला आला नाही. आयपीएल २०२४ चा सातवा सामना सीएसके आणि गुजरात टायटन्स यांच्यात झाला, या सामन्यात धोनीऐवजी समीर रिझवी फलंदाजीला आला.
अशातच आता धोनी फलंदाजीला का येत नाही? असा प्रश्न चाहत्यांनी विचारायला सुरुवात केली आहे. यानंतर या प्रश्नाचे उत्तर चेन्नई सुपर किंग्जचे फलंदाजी प्रशिक्षक माइक हसी यांनी दिले आहे.
गुजरातविरुद्धच्या सामन्यात CSK ने दमदार कामगिरी करत २० षटकात ६ गडी गमावून २०६ धावा केल्या. यात शिवम दुबेचे दमदार अर्धशतक आणि रचिन रवींद्रच्या ४६ धावांच्या खेळीचा समावेश होता. पण चाहते एमएस धोनीच्या फलंदाजीची आतुरतेने वाट पाहत होते, मातर्, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.
माईक हसीने पत्रकार परिषदेत सांगितले की, मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी फलंदाजांना खेळ पुढे नेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सीएसकेच्या फलंदाजी प्रशिक्षकाने असेही सांगितले की इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे संघांना त्यांची फलंदाजी मजबूत करण्याची संधी मिळाली आहे, त्यामुळे एमएस धोनी उशिरा फलंदाजीला येईल'.
हसीने सांगितले की, एमएस धोनीने अद्याप एकाही चेंडूचा सामना केला नसला तरी तो नेटमध्ये चांगल्या टचमध्ये दिसत आहे.
माईक हसीने पुढे सांगितले की, खेळ पुढे नेण्यासाठी फलंदाजांना वेगवान फलंदाजी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खेळाडूंना सांगण्यात आले आहे की ते फ्लॉप झाले तर त्यांच्यावर टीका केली जाणार नाही. आमच्याकडे फलंदाजीत खूप खोली आहे, त्यामुळे वरच्या फळीतील खेळाडूंना सकारात्मक विचार करण्यास सांगण्यात आले आहे. त्यांना प्रशिक्षक आणि कर्णधाराची पूर्ण साथ मिळेल. खेळाडूंनी स्वबळावर खेळ पुढे न्यावा अशी आमची इच्छा आहे. जर तुम्ही हे करू शकत असाल तर ते अधिक चांगले आहे. जर तुम्ही ते करू शकत नसाल तर तुमच्यावर टीका होणार नाही. फ्लेमिंग जलद खेळण्याबद्दल बोलतो आणि आम्हाला वेगवान खेळायचे आहे".
सीएसकेचा पुढचा सामना ३१ मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आहे. हा सामना विशाखापट्टणम येथे खेळला जाईल.