चेन्नई सुपर किंग्जने (२६ मार्च) गुजरात टायटन्सचा पराभव केला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सला ६३ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. त्याचबरोबर या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्जने गुणतालिकेत आपले स्थान मजबूत केले आहे. आता CSK चे २ सामन्यात ४ गुण झाले आहेत. याशिवाय त्यांचा नेट रन रेट प्लस १.९७९ आहे. अशाप्रकारे चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.
आयपीएलच्या गुणतालिकेत संजू सॅमसनची राजस्थान रॉयल्स दसऱ्या स्थानावर आहे. त्यांचे १ सामन्यात एक गुण आहे. तर नेट रनरेट +१.००० आहे. नेट रनरेटच्या बाबतीत राजस्थान रॉयल्स KKR, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्सच्या पुढे आहे.
कोलकाता नाइट रायडर्स लीग टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. केकेआरचे १ सामन्यात २ गुण आहेत. त्यांचा नेट रन-रेट +०.२०० आहे. त्यांनी त्यांच्या पहिल्या सामन्यात हैदराबादचा पराभव केला.
पंजाब किंग्जने आपल्या आयपीएल २०२४ मोहिमेची सुरुवात दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत विजयाने केली. परंतु दुसऱ्या सामन्यात त्यांना आरसीबीकडून पराभव पत्करावा लागला. दोन सामन्यांतून २ गुण असलेला पंजाब संघ सध्या चौथ्या स्थानावर आहे. त्यांचा नेट रनरेट +०.०२५ आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला आयपीएल २०२४च्या सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागला. मात्र आरसीबीने दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जला पराभूत करून गुणांचे खाते उघडले. २ सामन्यांत २ गुण असलेला बेंगळुरू संघ साखळी गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांचा नेट रनरेट -०.१८० आहे.
गुजरात टायटन्सने आयपीएल २०२४ मोहिमेची सुरुवात मुंबई इंडियन्सविरुद्ध विजयाने केली, परंतु दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागला. गुजरातचे २ सामन्यांतून २ गुण आहेत. ते गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहेत. टायटन्सचा नेट रनरेट सध्या -१.४२५ आहे
कोलकाता नाईट रायडर्सकडून पहिला सामना गमावलेल्या सनरायझर्स हैदराबादच्या खात्यात अद्याप एकही गुण जमा झालेला नाही. ते साखळी गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहेत. हैदराबादचा नेट रनरेट -०.२०० आहे.
मुंबई इंडियन्सचा त्यांच्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभव झाला. त्यामुळे मुंबई इंडियन्सला अद्याप गुणांचे खाते उघडता आलेले नाही. गुणतालिकेत ते आठव्या क्रमांकावर आहेत. मुंबई इंडियन्सचा नेट रनरेट -०.३०० आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जकडून पराभव झाला. त्यांचे शुन्य गुण असन गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहेत. दिल्लीचा नेट रनरेट -०.४५५ आहे.