LSG Vs RR Highlights : लखनौला हरवून राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये, संजू सॅमसनची मॅच विनिंग इनिंग-lsg vs rr ipl live score lucknow super giants vs rajasthan royals match scorecard updates ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  LSG Vs RR Highlights : लखनौला हरवून राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये, संजू सॅमसनची मॅच विनिंग इनिंग

LSG Vs RR Highlights : लखनौला हरवून राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये, संजू सॅमसनची मॅच विनिंग इनिंग

Apr 28, 2024 12:18 AM IST

LSG Vs RR IPL Score : आयपीएल २०२४ मध्ये आज राजस्थान आणि लखनौ आमनेसामने आहेत. या सामन्याचे लाईव्ह अपडेट्स येथे पाहू शकता.

LSG Vs RR Highlights : लखनौला हरवून राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये, संजू सॅमसनची मॅच विनिंग इनिंग
LSG Vs RR Highlights : लखनौला हरवून राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये, संजू सॅमसनची मॅच विनिंग इनिंग (PTI)

इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा ४४वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. लखनौच्या अटल विहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सचा ७ गडी राखून पराभव केला. 

लखनौने प्रथम फलंदाजी करताना १९६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानने १९ षटकांत ३ गडी गमावून लक्ष्य गाठले. राजस्थानसाठी संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांनी चमकदार कामगिरी केली. 

संजूने ३३ चेंडूत नाबाद ७१ धावा केल्या. त्याने ७ चौकार आणि ४ षटकार मारले. तर ध्रुव जुरेलने ३४ चेंडूत नाबाद ५२ धावा केल्या. जोस बटलर ३४ धावा करून बाद झाला. यशस्वी २४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. लखनौकडून यश ठाकूर, स्टॉइनिस आणि अमित मिश्राने १-१बळी घेतला.

लखनौ वि. राजस्थान क्रिकेट स्कोअर

लखनौ सुपर जायंट्सच्या १९७ धावा

लखनौ सुपर जायंट्सने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी १९७ धावांचे लक्ष्य दिले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राहुल आणि दीपक हुडा यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या शतकी भागीदारी झाली. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावरच लखनौने २० षटकांत ५ गडी गमावून १९६ धावा केल्या.

केएल राहुलने ४८ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकार मारले. दीपक हुडाने ५० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने ३१ चेंडूत ७ चौकार मारले. आयुष बडोनी १८ धावा करून नाबाद राहिला. स्टॉइनिस शून्यावर बाद झाला.

 राजस्थानकडून संदीप शर्माने २ बळी घेतले आणि या सामन्यात तो आपल्या संघासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. संदीप शर्माने ४ षटकात ३१ धावा दिल्या. ट्रेंट बोल्ट, आवेश खान आणि अश्विनने १-१ विकेट घेतली.

केएल राहुल बाद

वेगवान गोलंदाज आवेश खानने लखनऊचा कर्णधार केएल राहुलची अर्धशतकी खेळी संपुष्टात आणली. शतकाच्या वाटेवर असलेल्या राहुलला झेलबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. राहुल ४८ चेंडूत ७६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अशाप्रकारे लखनौने सध्या ५ विकेट्सवर १७४ धावा केल्या आहेत.

निकोलस पूरन बाद 

संदीप शर्माने अप्रतिम गोलंदाजी करत निकोलस पूरनला बाद करून राजस्थानला चौथे यश मिळवून दिले. १६व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर संदीपने निकोलस पूरनला झेलबाद केले. पुरन ११ चेंडूत ११ धावा करून बाद झाला. आयुष बडोनी सध्या कर्णधार केएल राहुलसोबत क्रीजवर आहे.

दीपक हुडा बाद

ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने दीपक हुडाला बाद करून राजस्थानला तिसरे यश मिळवून दिले. दीपक हुडाने केएल राहुलसोबत शानदार भागीदारी केली आणि अर्धशतकही पूर्ण केले. दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारीही पूर्ण केली, मात्र अश्विनने ही भागीदारी संपुष्टात आणली. दीपक हुडा ३१ चेंडूत ५० धावा करून बाद झाला.

दीपक हुडाचे अर्धशतक

कर्णधार केएल राहुलनंतर दीपक हुडानेही राजस्थान रॉयल्सविरुद्ध अर्धशतक ठोकले आहे. या दोन फलंदाजांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारीही पूर्ण झाली आहे.

केएल राहुलचे अर्धशतक

लखनौचा कर्णधार केएल राहुलने शानदार फलंदाजी करत राजस्थान रॉयल्सविरुद्ध अर्धशतक झळकावले. त्याने दीपक हुडाच्या साथीने सुरुवातीच्या धक्क्यांमधून संघाला सावरलं आणि पुन्हा एकदा कठीण काळात संघासाठी उपयुक्त खेळी खेळली.

मार्कस स्टॉइनिस बाद

वेगवान गोलंदाज संदीप शर्माने मार्कस स्टॉइनिसला बाद करत राजस्थानला दुसरे यश मिळवून दिले. क्विंटन डी कॉक बाद झाल्यानंतर क्रीजवर आलेल्या स्टॉइनिसला या सामन्यात काही खास करता आले नाही आणि संदीपने त्याला शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या सामन्यात लखनौची सुरुवात चांगली झाली नाही आणि संघाने ११ धावांवर २ विकेट गमावल्या आहेत. सध्या दीपक हुडा कर्णधार केएल राहुलसह क्रीजवर आहे.

लखनौला पहिला धक्का

वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने क्विंटन डी कॉकला बाद करून लखनौला पहिला धक्का दिला. बोल्टच्या पहिल्या दोन चेंडूंत डी कॉकने दोन चौकार मारले, मात्र तिसऱ्या चेंडूवर बोल्टने डी कॉकची दांडी उडवली. तीन चेंडूंत ८ धावा करून डी कॉक बाद झाला.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन) : क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसीन खान, यश ठाकूर

राजस्थानने टॉस जिंकला

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानने या सामन्यासाठी आपल्या प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनौनेही या सामन्यासाठी संघात कोणताही बदल केलेला नाही.