मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  CSK vs SRH Head to Head: चेन्नई सुपरकिंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज लढत, जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड

CSK vs SRH Head to Head: चेन्नई सुपरकिंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज लढत, जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 28, 2024 09:15 AM IST

Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad Head to Head: चेन्नई सुपरकिंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात कोणत्या संघाचे पारड जड आहे, हे जाणून घेऊयात.

आयपीएल २०२४: चेन्नई सुपरकिंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे.
आयपीएल २०२४: चेन्नई सुपरकिंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे. (PTI)

IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद (Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad) आज पुन्हा एक एकदा आमनेसामने येणार आहेत. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) हा सामना खेळला जाणार आहे. या हंगामात चेन्नईच्या संघाने आठ पैकी चार सामने जिंकले आहेत. तर, चार सामने गमावले आहेत. दुसरीकडे हैदराबादने आठ सामन्यापैकी पाच सामने जिंकले आहेत. आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत हैदराबाद तिसऱ्या स्थानावर आहे. तर, चेन्नईचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. दरम्यान, चेन्नई सुपरकिंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्डवर एक नजर टाकुयात.

ट्रेंडिंग न्यूज

CSK vs SRH Live Streaming: आज चेन्नईचे 'सुपरकिंग्ज' हैदराबादच्या 'सनरायझर्स'शी भिडणार; कधी, कुठे पाहायचा सामना?

हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपरकिंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत एकूण २० सामने खेळले गेले आहेत. यातील १४ सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने विजय मिळवला आहे. तर, हैदराबादने सहा सामने जिंकेल आहेत. दोन्ही संघामध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात चेन्नईने हैदराबादचा ७ विकेट्सने पराभव केला.

LSG vs RR IPL 2024 : राहुलवर संजू भारी! राजस्थानचा लखनौवर ‘रॉयल’ विजय, प्लेऑफमधील स्थान पक्के!

चेन्नईची खेळपट्टी

एमए चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. या खेळपट्टीवर फलंदाज मोठे फटके सहज खेळू शकतात. तर, मधल्या षटकांमध्ये फिरकीपटुंना चांगली मदत मिळते. या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करणे पसंत करतो. चेन्नईच्या मैदानावर धावांचा पाठलाग करताना संघ बऱ्यापैकी यशस्वी ठरला आहे. मात्र,आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Rishabh Pant Flies Kite: मुंबईविरुद्धच्या लाईव्ह सामन्यात ऋषभ पंत उडवू लागला पतंग, व्हिडिओ व्हायरल!

चेन्नईचा संभाव्य संघ:

रुतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, मोईन अली, एमएस धोनी (विकेटकिपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना.

इम्पॅक्ट प्लेअर: शार्दूल ठाकूर

हैदराबादचा संभाव्य संघ:

अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट.

इम्पॅक्ट प्लेअर: टी नटराजन.

IPL_Entry_Point